जळगाव जिल्ह्यात १९ हजार ४२१ फ्रंटलाईन कोरोना योध्दांनी घेतली लस 

जळगाव जिल्ह्यात १९ हजार ४२१ फ्रंटलाईन कोरोना योध्दांनी घेतली लस 
Updated on

जळगाव ः जिल्ह्यात आतापर्यंत आरोग्य, महसूल व पोलिस क्षेत्रातील १९ हजार ४२१ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. तर १ हजार ६१० लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली. ‘कोरोना’ लस सुरक्षितच आहे. त्याबाबत कोणी अपप्रचार केल्यास अथवा अफवा पसरविण्यावर कारवाईचे आदेश पोलिसांना दिले आहेत. 

जिल्ह्यात कोविड लसीकरणासाठी २४ हजार ५० लसीचे डोस प्राप्त झाले असून आतापर्यत फ्रंटलाईन आरोग्य सेवा देणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यासह दुसऱ्या टप्प्यात वरिष्ठ श्रेणीचे अधिकाऱ्यांचे लसीकरण केले जात आहे. कोरोना लस सुरक्षित व परिणाम कारक आहे. परंतु बऱ्याच ठिकाणी अर्धवट माहितीच्या आधारावर कोरोना लस घेउनही कोरोना बाधीत अपप्रचार वा अफवा पसरविल्या जात आहेत. असा अपप्रचार करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

प्रतिकारक्षमता वाढेल ४२ दिवसांनी 
आयसीएमआर, केंद्रीय आरोग्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील अहवालानुसार कोवीशिल्ड आणि कोव्हॅक्सीन सुरक्षित, परिणाम कारक आहेत. लस घेतल्यानंतर कोवीड प्रतिकारक्षमता निर्माण होण्यास पहिला डोस घेतल्यानंतर किमान ४२ दिवस तर दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनंतर निर्माण होते.त्यामुळे लस घेतलेली असली तरी या कालावधीत कोरोना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी मास्क, सॅनिटायझर तसेच सोशल डिस्टंन्सिंग नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. 
 

साईड इफेक्ट नाहीच 
बऱ्याच ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या उपयुक्ततेबाबत, ती घेतल्यानंतर होणाऱ्या साईड इफेक्ट बाबत अनेक शंका कुशंका घेतल्या जात आहेत. या लसी संदर्भात गैरसमज आणि अफवा पसरविणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Girna Dam Water Storage
Ganesh Idol Broken News
Jalgaon flyover collapse contractor FIR
Jalgaon bypass one way traffic
Marathi News Esakal
www.esakal.com