Jalgaon News : पांढरे सोने शेतकऱ्याच्या दारातच

Cotton Rate Decrease
Cotton Rate Decreaseesakal

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : निसर्गाच्या लहरीपणाशी दोन हात करीत खरीप हंगाम फुलवणाऱ्या शेतकऱ्याच्या नशिब शेतीमालाला पुरेसा भाव मिळत नसल्याने निराशाच येत आहे. गतवर्षी अतिवृष्टीमुळे मार खाऊनही कापसाचे दर दहा ते बारा हजार रूपये प्रतिक्विंटल पोचल्याने शेतकऱ्यांचे काहीअंशी नुकसान भरून निघाले होते.

यंदाही कापसाला दहा हजाराच्या आसपास भाव मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली आहे. त्यामुळे तालुक्यात पांढरे सोने अद्यापही काळवंडले असून, भाव वाढेल या अपेक्षेने शेतकरी कापूस विक्री करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. (Cotton rate decrease in market farmers upset Jalgaon News)

Cotton Rate Decrease
Jalgaon Crime News : गुटखा तस्कर कारसह LCBच्या जाळ्यात पावणेतीन लाखांच्या गुटखा जप्त, एकाला अटक

कापसाला प्रतिक्विंटल शासकीय हमीभाव ६ हजार ३८० रुपये दिला आहे. दुसरीकडे कापूस उत्पादन निघण्याच्या सुरवातीला बऱ्यापैकी भाव होता. त्यामुळे अडचण भागवण्यासाठी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना कापूस देणे पसंत केले. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर वाढत नसल्याचे कारण सांगत खासगी व्यापारी सध्या कापसाला ८ हजार ते ८ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल भाव देत आहेत.

गेल्या वर्षी अतिवृष्टीने शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला. कापसाचे उत्पन्न निम्म्यापेक्षा कमी झाले, पण कापसाचे दर दुपटीने वाढले होते. यंदाही निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला. यंदा कापसाला चांगला भाव मिळेल, अशी आशा होती. दोन महिन्यांपूर्वी कापसाला नऊ हजार रुपयांपर्यंत दर मिळाला.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

Cotton Rate Decrease
Crime News : विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पत्नीची हत्या; मृतदेहाचे तुकडे करून कालव्यात दिले फेकून

त्यानंतर भावाची घसरण झाली. आता आठ हजारांच्या आतच पांढरे सोने चकाकत आहे. खानदेशचा कापूस गुजरातमध्ये जातो. त्यातच गुजरातमध्ये कापूस खरेदी मंदावल्याने राज्यातही त्याचा फटका बसला आहे.

चाळीसगाव तालुक्यात कपाशीकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते. तालुक्यात दरवर्षी सुमारे तीस ते चाळीस हजार हेक्टरवर कपाशीची लागवड होते. यंदा मात्र लागवड सरासरीसारखीच राहिली असली तरी कपाशीचे उत्पादन निसर्गाच्या लहरीपणामुळे घटले आहे. त्यातच कापसाचे दर घसरत असल्याने शेतकऱ्यांचा धीर सुटत चालला आहे.

Cotton Rate Decrease
SAKAL Impact News : समस्या दूर होताच साईंग्राम उद्यान चकाचक!

जवळपास सर्वच शेतकऱ्यांची कापूस वेचणी आवरती झाली आहे. कपाशीवर झालेला खर्च आणि मिळणारा भाव यात ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी निराश आहे. किमान दहा हजार रूपये भाव मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे शेतकरी कापूस विक्री करीत नसल्याचे चित्र आहे.

कापूस थप्पी लावून ठेवला

चाळीसगाव तालुक्यात तीन जीनिंग आहेत. त्यांनाही अपेक्षित कापूस मिळत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. अपेक्षित भाव नसल्याने शेतकरी गरजेपुरता कापूस विक्री करीत आहे. सधन व गरज नसलेले शेतकरी कापूस आताच विकण्याच्या मनस्थितीत नाहीत. गत दोन, तीन वर्षांचा अनुभव पाहता जानेवारी ते मार्च दरम्यान दरवाढ होते, हे गणित लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या घरात कापूस थप्पी लावून ठेवला आहे.

Cotton Rate Decrease
Nashik News : कामाच्या अनुभवावरून सफाई कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणार! राज्य शासनाचा निर्णय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com