
आक्षेप निवारण समितीने ऑडिटरची तपासणी, रुग्णांच्या बिलाची तपासणी व खासगी रुग्णालयांनी आकारलेली बिले पाहिली.
जळगाव ः कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने जिल्ह्यात ४४ खासगी रुग्णालयांना कोविड केअर हॉस्पिटलला परवानगी देण्यात आली होती. कोरोना रुग्णांकडून अवाच्या सव्वा बिले खासगी रुग्णांलयांनी वसुली केल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे जिल्हास्तरावर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली कोविड बिल आक्षेप व निवारण समितीची स्थापना करण्यात आली. त्यासाठी ऑडिटरचीही नेमणूक करण्यात आली होती. त्यात, तब्बल दोन कोटींपेक्षा अधिक रक्कम खासगी रुग्णालयांनी जादा आकारण्याचे दिसून आले आहे.
आवश्य वाचा- धक्कादायक! पिता-पुत्राचे सुरू होते भांडण; वडिलांनी चाकु हिसकावताच घडले भयंकर
आतापर्यंत जिल्ह्यात ९५ टक्के रुग्णांलयाचे कोरोना रुग्णांनी केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने ऑडिट करण्यात आले. त्यात एक हजार ८९६ रुग्णांनी खासगी डॉक्टरांनी जादा बिले वसूल करण्याच्या तक्रारी केल्या होत्या. शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक दर खासगी डॉक्टरांनी घेतलेले आढळून आल्यानंतर त्यांना जादा बिलाचे पैसे संबंधितांना परत करण्याचे आदेश देण्यात आले.
आवर्जून वाचा- 'कटप्पा ने बाहूबली को क्यों मारा' असे पून्हा का म्हणाले जलसंपदा मंत्री
एक हजार ८९६ रुग्णांकडून १४ कोटी २८ लाख १९ हजार ३९० रुपयांची वसुली करण्यात आली. वास्तविक शासनाच्या नियमानुसार ती रक्कम १२ कोटी २० लाख १९ हजार ८२३ एवढीच होती. तब्बल दोन कोटींपेक्षा अधिक रक्कम बिलापोटी आकारली असल्याचा अहवाल आहे. यामुळे आक्षेप निवारण समितीने ऑडिटरची तपासणी, रुग्णांच्या बिलाची तपासणी व खासगी रुग्णालयांनी आकारलेली बिले पाहिली. त्यात रुग्णांची बिले व खासगी रुग्णालयांनी आकारलेली बिले व शासनाने ठरवून दिलेली फी याच्या समोरासमोर सुनावणी झाली. रुग्णांना जादा बिल आकारण्याबाबत विचारून जादा घेतलेली रक्कम परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे कोरोना रुग्णांना जादा बिलातून काही जादाची रक्कम परत मिळाल्याचे समाधान आहे.
कोवीड बिल आक्षेप निवारण समितीला आतापर्यंत दोन कोटी रुपये खासगी रुगणालयाने आकारल्याचे आढळले. जादा आकारलेल्या जादा रकमेपैकी एक कोटींपेक्षा अधिकच रक्कम संबंधित रुग्णांना परत करण्याचे आदेश संबंधित रुग्णालयांना देण्यात आले आहेत.
- डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक
संपादन- भूषण श्रीखंडे