
लाच लुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडून पोलिस दलात गेल्या काही महिन्यापासून कारवाई सत्र तक्रारीनूसार सुरू आहे.
जळगाव : जळगाव पोलिसतील कर्मचाऱ्यांवर एसीबी पथकाकडून गेल्या तीन-चार महिन्यापासून कारवाईचे सत्र सुरूच आहे. आज पाळधी येथील चेकपोस्टववरील पोलिस शिपाई अपघातग्रस्त वाहन सोडविण्यासाठी पंधरा हजाराची लाच स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंधात्मक विभागाने सापळा रचुन कारवाई केली आहे.
आवश्य वाचा- चिमुकली होती म्हणून वाचले आई अन् लहान बहिणीचे प्राण..घडला प्रकार भयानक
अपघाताच्या गुन्ह्यातील संशयीत आरोपीला मदत करण्यासह अपघातग्रस्त वाहन सोडवण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारतांना पोलिस कर्मचारी सुमीत संजय पाटील याला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
जप्त वाहन सोडविण्यासाठी मागितली लाच
भुसावळ येथील २७ वर्षीय तरुणाच्या वाहनाचा चालकाकडून काही दिवसांपुर्वी अपघात झाला होता. त्या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. पाळधी दुरक्षेत्रात ठाण्यात गुन्हा दाखल होता. संबधीताचे जप्त चारचाकी वाहन सोडवण्याकामी पोलिस कर्कमचारी सुमीत पाटील याने १५ हजाराची लाच तक्रारदाराकडून मागितली होती. तक्रारदाराने एसीबी कार्यालय गाठून तक्रार दिली.
आवर्जून वाचा- तहान भागविण्यासाठी खाली उतरला अन् जीवनच संपले; धावत्या रेल्वेत चढणे पडले महागात
असा रचला सापळा..
उपविभागीय पेलिस अधीकारी गोपाल ठाकुर, निरीक्षक निलेश लोधी, संगोग बच्छाव, रविंद्र माळी, अशोक अहिरे, ईश्वर धनगर, नासिर देशमुख यांच्या पथकाने पाळधी चेकपोस्टववर सापळा रचला होता. तक्रारदार तरुण आल्यावर सुमीत पाटिल ने त्याच्याकडून पंधरा हजार स्वीकारताच त्याला अटक करण्यात आली.
संपादन- भूषण श्रीखंडे