Jalgaon Crime News : खुनाच्या गुन्ह्यातील फिर्यादीला धमकी | crime of murder Threat to plaintiff Jalgaon Crime News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Jalgaon Crime News : खुनाच्या गुन्ह्यातील फिर्यादीला धमकी

Jalgaon News : पोलिस कर्मचारी विरुद्ध खुनाच्या गुन्ह्यात फिर्यादी असलेल्या व्यक्तीला न्यायालयात कामाला आला असताना, तिघांनी शिवीगाळ व दमदाटी केली. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जिल्‍हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिंग रोडवरील राजस हॉस्पिटलमध्ये पत्नी व मुलीची हत्या केल्याप्रकरणी वॉर्डबॉय असलेल्या सचिन गुमानसिंग जाधव याच्यासह त्याचा पोलिस भाऊ नितीन गुमानसिंग जाधव याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. (crime of murder Threat to plaintiff Jalgaon Crime News)

या खटल्याची जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मृत विवाहितेचा भाऊ तसेच फिर्यादी तुषार जयसिंग राजपूत (वय ३९, साक्री, ता. धुळे) हा न्यायालयात आला असताना, पोलिस कर्मचारी नितीन गुमानसिंग जाधव याने कोर्ट कॅण्टीनजवळ तुषार राजपूत यांना उद्देशून ‘याला पाहुन घ्या, गाडी मागे लावा’, असे सांगत धमकावून शिवीगाळ केली.

याबाबत तुषार राजपूत याने दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक किशोर पवार तपास करीत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

टॅग्स :Jalgaoncrimemurder case