
Jalgaon News : जिल्ह्यात अद्यापही पाऊस सुरू झालेला नाही. एकीकडे तापमानात वाढ होत आहे, तर दुसरीकडे पाणीटंचाईचे संकट अधिकच गडद होत आहे.
टँकरची संख्या आता २९ वर पोहोचली आहे, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. आठवडाभर पाऊस न आल्यास तीव्र पाणीटंचाईचा सामना गावांना करावा लागणार आहे.
जिल्ह्यात तापमानाचा पारा ४२ अंशावर स्थिरावला आहे. तापमानामुळे विहिरींनी तळ गाठल्याने ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे, तर शहरी भागात आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. (crisis of water scarcity is acute in district Number of tankers up to 29 Wells hit bottom Chalisgaon Jamner worst affected Jalgaon News)
यामुळे नागरिकांचे पाण्याअभावी प्रचंड हाल होत आहे. दरम्यान, ग्रामीण भागातील ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. एकूण २६ गावांमध्ये २९ टँकरसद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यात शासकीय नऊ आणि खासगी २० टँकरचा समावेश आहे.
या गावांमध्ये झाल्या विहीर अधिग्रहण
जिल्ह्यात जामनेर तालुक्यात २६, भुसावळ १, मुक्ताईनगर ११, बोदवड ४, धरणगाव ३, पारोळा ६, एरंडोल १, पाचोरा ६, चाळीसगाव १, रावेर १, अमळनेर ९, भडगाव २, चोपडा २, असे एकूण ७३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
तालुका- टँकर्सची संख्या
जळगाव--१
जामनेर--६
भुसावळ--२
बोदवड--१
पारोळा--२
पाचोरा--३
चाळीसगाव--९
भडगाव--२
एकूण--२९
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
"अल निनो’ च्या प्रभावामुळे यंदाचा उन्हाळा अतिकडक गेला. यामुळे पाऊसही उशिरा पडण्याचे संकेत आहेत. यामुळेच आम्ही ऑगस्टपर्यंत धरणातील पाणी पुरेल, असे नियोजन केले आहे. वाढीव टंचाई आराखडाही तयार केला आहे."
-अमन मित्तल, जिल्हाधिकारी, जळगाव
चार तालुक्यांत पाणीपातळीत कमालीची घट
अतितापमानाने जिल्ह्यातील विहिरींच्या पाणी पातळीत घट होत आहे. मे महिन्यात तापमान ४० ते ४७ अंशादरम्यान होते. यामुळे जिल्ह्यातील चार तालुक्यांतील पाणी पातळीत अर्धा मीटरने घट झाल्याची माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिक विभागाकडून देण्यात आली.
आगामी १५ दिवसांत पाऊस न झाल्यास जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाई आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातील बोदवड, यावल, भुसावळ आणि जामनेर तालुक्यांतील भूजल पातळीत ०.३५ मीटरने घट झाली असून, इतर तालुक्यांत पाण्याची पातळी समाधानकारक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.