Jalgaon News : ‘रायसोनी’त नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम! अंमलबजावणीची तयारी

G. H, Raisoni College
G. H, Raisoni Collegeesakal

Jalgaon News : जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग ॲन्ड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाने नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुसरून अभ्यासक्रम तयार केला आहे. यानिमित्त महाविद्यालय कात टाकण्यासाठी सज्ज होतेय. (Curriculum according to new education policy in Raisoni college Preparation for implementation Jalgaon News)

महाविद्यालयात ‘नवीन शैक्षणिक धोरण २०२० ची दूरदृष्टी व त्याचे कृतीत रूपांतर’ या विषयावर कार्यशाळा झाली. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी सुरवातीला महाविद्यालयाच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला. त्या म्हणाल्या, की जागतिक स्तरावरील समस्या सोडवायच्या असतील, तर आपण कात टाकली पाहिजे. त्यासाठी हे नवे शैक्षणिक धोरण मदत करेल.

नव्या रचनेत एकाच वेळी वेगवेगळे विषय एकत्रितपणे शिकता येणार आहेत. यात ‘मेजर’ आणि ‘मायनर’, असे विषयांचे विभाजन असेल. तसेच ओपन इलेक्टिव सब्जेक्ट, ऑन द जॉब ट्रेनिंग, फिल्ड प्रोजेक्ट,

समाजाभिमुख विविध कार्यक्रम, इंडियन नॉलेज सिस्टिम अंतर्गत येणाऱ्या संस्कृती व ज्ञान या विविध वैशिष्टपूर्ण विषयांचा अभ्यासक्रमात समावेश करत रायसोनी महाविद्यालय विद्यार्थ्यांना दोन क्रेडिट देणार असल्याचे नियोजन आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना आपल्या सिस्टिममध्ये मेजर विषयांमध्ये ६४ क्रेडिट, तर मायनर विषयांमध्ये २० ते २४ क्रेडिट असणार आहे. म्हणजेच रायसोनी महाविद्यालय मल्टिडिसिप्लनरी ॲप्रोच इंट्रोड्यूस करीत असून,

महाविद्यालयात शिक्षण घेत असलेला एकदा विद्यार्थी तो शिकत असलेल्या शाखेत मेजर ६४ क्रेडिट मिळवेल व त्याच्या शाखेव्यतिरिक्त त्याला इतर शाखेतील विषय शिकायची इच्छा असेल, तर तो विद्यार्थी मॅकेनिकल शाखेत शिकत आहे,

तर त्याचे मेजर ६४ क्रेडिट असतील आणि त्याला इतर विषयात जसे की मॅकेनिकल शिकत असतानाही एमबीए विषयातील एखादा विषय, संगीत, साहित्य, नृत्य हे विविध विषय शिकून त्याचे मायनर २० ते २४ क्रेडिट प्राप्त करू शकणार आहे.

म्हणजेच रायसोनी महाविद्यालयात २०२३-२४ पासून एकाच वेळी वेगवेगळे विषय एकत्रितपणे शिकता येणार आहेत आणि या ‘मायनर’ विषयांसाठी रायसोनी महाविद्यालयात १५ पर्याय दिले जाणार आहेत. तसेच रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंनिनिअरिंग ॲन्ड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात आधीच दहा विभाग असल्याने विद्यार्थ्यांना आता बहुआयामी शिक्षण मिळणार आहे.

G. H, Raisoni College
Dhule News : मराठी विषयाचे मूल्यमापन आता ‘श्रेणी’ स्वरूपात! मविआ’चा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने फिरविला

इंडियन नॉलेज सिस्टिम

सोबतच इंडियन नॉलेज सिस्टिममध्ये विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील किल्ले, भारतातील मुख्य नद्या, अजिंठा, एलोरा यांसारख्या विविध लेण्यांच्या अभ्यासासाठी दोन क्रेडिट दिले जाणार आहेत.

अंगभूत गुणांचा विकास

अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व व अंगभूत गुणांचा विकास हा समतोल राखण्याची अपेक्षा धोरणात व्यक्त करण्यात आली असल्याने याची सर्वांग अंमलबजावणी रायसोनी महाविद्यालयात केली जाणार आहे.

वक्तृत्व, संगीत, साहित्य, कला, टीमवर्क, नेतृत्व, संशोधन, प्रयोग, उद्योजकता, समाजसेवा, नैतिकता, साहस, राष्ट्रप्रेम, परोपकार, मानवता, खेळ, चारित्र्य अशा विविध पैलूंची ओळख व प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जावे,

या विविध बाबींवर फोकस केले आहे, असेही प्रा. अग्रवाल यांनी सांगितले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल रायसोनी इन्स्टिट्यूटचे संचालक प्रीतम रायसोनी यांनी अभिनंदन केले.

G. H, Raisoni College
Sunflower Crop: कौतिकपाडेतील सुर्यफूलांची शेती वेधतेय लक्ष! विलास दातरेंकडून 12 एकर सूर्यफुलांची लागवड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com