Jalgaon Crime News : सायबर गुन्हेगारांना गोव्यातून अटक

विम्यावर अधिक बोनस व मेडिकल कव्हर मिळवून देण्याचे आमिष दाखवत आठ लाख ९५ हजार ६४६ रुपयांमध्ये फसवणूक केल्याच्या अनेक घटना जिल्ह्यासह राज्यात घडत आहेत.
Cyber ​​criminals
Cyber ​​criminalsesakal

Jalgaon Crime News : विम्यावर अधिक बोनस व मेडिकल कव्हर मिळवून देण्याचे आमिष दाखवत आठ लाख ९५ हजार ६४६ रुपयांमध्ये फसवणूक केल्याच्या अनेक घटना जिल्ह्यासह राज्यात घडत आहेत.

जळगाव सायबर पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावण्यात यश मिळवले आहे. (Cyber ​​criminals arrested from Goa jalgaon crime news)

विशेष म्हणजे संपर्काचे कॉलसेंटर दिल्लीत, भामट्यांचे अकाऊंट ऑपरेटिंग उत्तर प्रदेशातून आणि लूटलेली रक्कम गोव्यात विड्रॉल करणाऱ्या अवधेशकुमार रामकिशोर (वय २४) व रामप्रसाद निशाद लल्लू निशाद (वय २५)या दोघांना गोवा येथून जळगाव सायबर पोलिस पथकाने अटक केली.

सायबर पोलिस ठाण्यात डिसेंबर महिन्यात दाखल झालेल्या या गुन्ह्याचा तपास सुरू असताना तपास पथकाला तांत्रिक विश्लेषणातून असे आढळून आले की, जिल्ह्यासह राज्यातील खासकरून मराठी व्यक्तींना संपर्क करून त्यांना विमा पॉलिसीतून अधिक बोनस व मेडीकल कव्हर मिळवून देण्याचे आमिष देत किंवा शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष देत गंडवण्यासाठी सायबर गुन्हेगारांकडून मुळ दिल्लीच्या कॉल सेंटर मधून संपर्क करून उत्तरप्रदेशातील क्ष खात्यामध्ये पैसे मागवले जातात.,

Cyber ​​criminals
Nashik Fraud Crime : बनावट डिमांड ड्राफ्ट बनवून ॲक्सिस बँकेला साडेतीन कोटींचा गंडा

तेथून गोवा येथील खात्यात वर्ग करून त्या खात्यातून पैसा विड्रॉल करत तिसऱ्याच वेगळ्या खात्यात भरणा केला जात असल्याचे आढळून आले आहे.

अटक केलेल्या दोघांकडून मोबाईल, सिमकार्ड, चेकबुक, डेबिट कार्ड व इतर साहित्य हस्तगत केले. या दोघांकडून जिल्हा आणि राज्यातील इतरही गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Cyber ​​criminals
Solapur Crime : लॉजवर तरुणीचा विनयभंग; सोलापुरातील दोघांविरुद्ध गुन्हा

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com