Jalgaon Cyber Crime : 9 लाखाला गंडविणाऱ्या सायबर गुन्हेगाराला कोलकत्ता अटक

नऊ लाखाचा गंडा घातल्याच्या आरोपावरून सायबर पोलिसांनी कोलकता येथून एका संशयिताला अटक केली आहे.
Jalgaon Cyber Crime
Jalgaon Cyber Crime esakal

Jalgaon Cyber Crime : ऑनलाइन टास्क पूर्ण करून गुंतवणूक केल्यास जास्तीचा नफा मिळवून देण्याच्या आमिषाने नऊ लाखाचा गंडा घातल्याच्या आरोपावरून सायबर पोलिसांनी कोलकता येथून एका संशयिताला अटक केली आहे.

गौरव गौतम बर्मन (वय २४, रा. राजरहाट, गोपालपूरा, कोलकता) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. जामनेर येथील चेतन कन्हैया फिरके (वय ३१) यांची ८ लाख ७५ हजाराचा गंडा घालण्यात आला होता. (Cyber ​​police arrested suspect from Kolkata on charges of extortion of Rs 9 lakh jalgaon crime news)

फिरके यांच्या व्हॉटस्अप व टेलिग्राम आयडीवर (३१ ऑगस्ट ते, ९ सप्टेंबर) दरम्यान सायबर गुन्हेगाराने संपर्क करून त्यांना टास्क देऊन तो पूर्ण करून त्यात गुंतवणूक केल्यास अधिकचा नफा देण्याचे आमीषाने या अनोळखीने फिरके यांच्याकडून वेळोवेळी एकूण आठ लाख ८२ हजार रुपये स्वीकारले.

त्यापैकी टास्क पूर्ण केल्याबद्दल भरलेल्या एकूण रकमेपैकी केवळ सहा हजार ८२५ रुपये त्यांच्या खात्यात परत करण्यात आले.उर्वरित नफा व मुद्दल रक्कम मात्र परत केली नाही परिणामी फसवणूक झाल्याचे फिरके यांना खात्री झाली.

Jalgaon Cyber Crime
Solapur Crime News : पुणे, सांगली, सोलापुरातील दुचाकी चोरणारा जेरबंद; चोरट्याकडून पाच दुचाकी हस्तगत

कोलकत्त्यातून अटक

फिरके यांना ठरल्या प्रमाणे गुंतवणुकीवरील नफा आणि मुद्दलही परत दिली नाही. मात्र त्यांना एक बनावट पत्र दिले असून त्यावर विदेशातील एका स्टॉक एक्सचेंजचे नाव आहे. याबाबत जळगाव सायबर पोलिस ठाण्यात (ता.९ सप्टेंबर २०२३) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानुसार सायबर पोलिस ठाण्यातील तज्ञ या गुन्ह्याचा तपास करत होते. त्यानुसार तपासात गौरव गौतम बर्मन (वय २४, रा. राजरहाट, गोपालपूरा, कोलकाता) याने हा गुन्हा केल्याचे तांत्रिकी माहितीच्या अधारे निष्पन्न झाले.

त्यानुसार पोलिसांनी गौरव बर्मन याला रविवार(ता.११) रोजी सकाळी ७ वाजता कोलकत्ता येथून अटक केली आहे. पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार वसंत बेलदार, हेमंत महाडिक, मिलिंद जाधव यांचा पथकाने ही कामगिरी केली.

Jalgaon Cyber Crime
Nashik Cyber Crime: सोशल मीडियावर महापुरुषांविषयी आक्षेपार्ह Tweet! नाशिक पोलिसांकडून संशयिताला मुंबईतून अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com