Jalgaon Crime News : दसऱ्याच्या खरेदीला आलेल्या गृहिणीच्या पर्सवर डल्ला

Dasara Festival Market
Dasara Festival Marketesakal
Updated on


जळगाव : शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या फुले मार्केट परिसरात खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पर्समधून पाच ग्रॅम सोन्याचे दागिने, २० हजार ९०० रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. शहर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

ललिताबाई पीतांबर राठोड (वय ५५) कासमवाडी येथे कुटुंबीयांसह राहतात. दसऱ्याच्या खरेदीसाठी त्या मंगळवारी (ता. ४) दुपारी चारला खरेदीसाठी बाजारात आल्या होत्या.(Dasara Festival News women Purse Theft in Shopping Market Jalgaon News)

Dasara Festival Market
Jalgaon : शहरातील रस्त्यातील 'खड्ड्यांचे' कधी होणार सीमोल्लघंन?

बाजारातून खरेदी करून फुले मार्केटमधील एका दुकानाच्या बाजूला उभ्या असताना चोरट्यांनी त्यांच्या पर्समधून २० हजार ९०० रुपयांची रोकड, सोन्याचे दागिने व इतर सामान नेले. या संदर्भात त्यांनी सायंकाळी सहाला जळगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक योगेश बोरसे तपास करीत आहेत.

Dasara Festival Market
Jalgaon Crime : गरीब हमाल तरूणावर चाकूहल्ला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com