dead
deadesakal

Jalgaon News : जळगावच्या तरुणाचा रेल्वेमार्गावर मृतदेह

Jalgaon News : भादली-जळगाव अप रेल्वे लाईनवरील रेल्वेमार्गावर एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दीपक सुकलाल सोनवणे (२४, रा. पवननगर, जळगाव) असे त्या तरुणाचे नाव आहे.(Dead body of Jalgaon youth on railway track jalgaon news)

दीपक हा तरुण आई, वडील भावासोबत शहरातील कांचननगरात वास्तव्यास आहे. कटलरी व मजुरीचे काम करून उदरनिर्वाह करत होता. रविवारी(ता. १२) दुपारी बाराला दीपक कामानिमित्त घरातून बाहेर निघून गेला होता.

दरम्यान भादली ते जळगाव अप रेल्वे मार्गावरील खांब क्रमांक ४२० च्या २६ ते २८ च्या दरम्यान सोमवारी (ता.१३) मध्यरात्री दोनच्या सुमारास दीपक सोनवणे यांचा मृतदेह आढळून आला. लोको पायलट रामेश्वर प्रसाद यांनी वॉकीटॉकीवरून शनिपेठ पोलिसांना कळविले.

dead
Jalgaon Accident News : महामंडळ बसने दांपत्यास चिरडले

त्यानुसार पोलिस नाईक रवींद्र पाटील, परिष जाधव, मुकुंद गंगावणे यांच्यासह इतर सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला.

तरुणाचा मृत्यू कशामुळे झाला हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. उपनिरीक्षक चंद्रकांत धनके तपास करत आहे.

dead
Jalgaon Accident News : कठड्याला कारची धडक; एक ठार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com