
Jalgaon Leopard News : मांडवेजवळ मृत बिबट्या आढळल्याने खळबळ
Jalgaon News : येथून जवळ असलेल्या मांडवे बुद्रूक गावाजवळील तडवी समाजाच्या स्मशानभूमीत सहा ते सात वर्ष वयाची बिबट्या मादी गुरुवारी (ता. १) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मृतावस्थेत आढळून आली. (Dead leopard found near Mandwe jalgaon leopard news)
मांडवे बुद्रूक येथील ग्रामस्थ स्मशानभूमीत गावातील महिलेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी गेले असता त्यांना बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. ग्रामस्थांच्या वतीने पोलिस पाटील सागर जाधव यांच्या मार्फत वन अधिकाऱ्यांना कळविण्यात आले.
हा बिबट्या रात्रीच्या वेळेस मृत झाला असावा, अशी चर्चा आहे. बिबट्याच्या जवळ झुडपात कुत्र्याचे पिल्लू मृतावस्थेत आढळून आले. त्यामुळे कुत्र्याची शिकार करताना काही घातपाताची शक्यता ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. बिबट्याचा पंचनामा करण्यासाठी जामनेर येथील पशुवैद्यकीय डॉक्टरच्या पथकालाही पाचारण करण्यात आले होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
जागेवर पंचनामा न करता वन विभागाचे अधिकारी पंचनाम्यासाठी जामनेर येथे घेऊन गेले. या वेळी वनपाल प्यारेलाल महाजन, वन कर्मचारी शब्बीर पिंजारी, वनपाल विकास गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती कुरील, डॉ. श्रीकांत व्यवहारे, योगेश किनगे, सरपंच ईश्वर निंबाळकर, उपसरपंच महेमूद तडवी, सागर जाधव, पोलिस पाटील ग्रामपंचायत सदस्य कैलास कोळी उपस्थित होते. मृत बिबट्याला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जामनेर येथे नेले असून, पंचनाम्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे वनविभागातर्फे सांगण्यात आले.