Jalgaon Accident News : विचित्र अपघातात पुरोहितासह माय-लेकीचा मृत्यू

Accident News
Accident Newsesakal

Jalgaon News : तालुक्यातील कानळदा गावाजवळील समर्थ शाळेनजीक झालेल्या विचित्र अपघातात दुचाकीस्वार पुरोहितासह अनोळखी तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

त्याच दुचाकीवर ट्रिपलसीट असलेली महिला अत्यवस्थ असून रिक्षातील चालक व चार महिला प्रवासी जखमी झालेत. ही घटना सोमवारी (ता. २६) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.

कानळदा गावाजवळील समर्थ शाळेसमोरून जात असताना वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने दुचाकीला कट मारला. (Death of Mother and daughter along with priestess in a freak accident sand tractor cut rickshaw also overturned Triple seat travel on a bike Jalgaon Accident News)

दुचाकीस्वार डिगंबर ऊर्फ महेश गोकूळ जोशी या पुरोहिताची ओळख पटली असून रात्री आठ वाजेपर्यंत मृत तरुणीची ओळख पटविण्याचे काम तालुका पोलिस करत होते. जखमींना खासगी व जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

डिगंबर ऊर्फ महेश गोकूळ जोशी (रा. पिंप्री ता. धरणगाव) हे त्यांच्या दुचाकी वाहनाने (एमएच १९ बीवाय ९९०३) कानळदा रोडवरून जळगाव शहराकडे येत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत दुचाकीवर अनोळखी महिला आणि २२ वर्षीय तरुणी बसलेले होते.

Accident News
Jalgaon News : मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यावर खडसे ठाम; राष्ट्रवादी काँग्रेसचे आज आंदोलन

यात दुचाकीस्वार महेश यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने तिघे रस्त्यावर पडले. तेवढ्यात जळगाव शहराकडून येणाऱ्या रिक्षेने (क्र. एमएच १९ व्ही ८०७०) रोडवरील तिघांना चिरडले व रिक्षा देखील या अपघातानंतर उलटली.

या रिक्षातील प्रवासी विमलबाई चौधरी, मंगलाबाई चौधरी, सुनीता चौधरी, राधाबाई चौधरी आणि रिक्षाचालक रवींद्र भावलाल पाटील (सर्व रा. आव्हाणे ता.जि.जळगाव) हे जखमी झाले. काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती.

खासगी वाहनातून दुचाकीवरील तीनही जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. दुचाकीवरील तिघा जखमींपैकी अनोळखी तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुचाकीस्वार महेश जोशी आणि अनोळखी महिला यांची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Accident News
Jalgaon News : मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यावर खडसे ठाम; राष्ट्रवादी काँग्रेसचे आज आंदोलन

पालकमंत्र्यांकडून पाहणी

अपघातानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची चौकशी केली. गंभीर जखमीच्या उपचाराबाबत माहिती घेतली. अपघातात तरुणी रुग्णालयात आणताना उशीर झाल्याने मृत झाली होती तर, दिगंबर जोशी या तरुणाचा संध्याकाळी उपचारादरम्यान मृत्यू तर, रात्री पावणे नऊ वाजता महिलेचाही मृत्यू झाला. तालुका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक नयन पाटील,सहाय्यक फौजदार अनिल फेगडे मयतांची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न करत होते.

मृतदेहांसाठी ॲम्बुलन्स मिळेना..

जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या जळगाव शहरापासून १५-२० किलोमीटर अंतरावर सकाळी साडेदहाच्या सुमारास कानळदा रोडवर विचित्र अपघात होवुन दुचाकीवरील तरुणासह मागे बसेलेल्या माय-लेकी गंभीर जखमी झाल्या. रस्त्यावर रक्ताचा सडा पडला असताना जखमींची अवस्था पाहून त्यांना उचलूनही नेण्यास कोणी तयार हेाईना. परिणामी बराच वेळ जखमी तसेच रस्त्यावर पडून होते.

ॲम्बुलन्सला कॉल करूनही पोहचत नसल्याने खासगी प्रवासी वाहतूक रिक्षातून अत्यवस्थ रुग्णास जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. शहरा जवळील अपघाताला शासकीय ॲम्बुलन्स मिळत नसेल तर, शासनाच्या ॲम्बुलन्स सेवा नावालाच आहे की, काय असा सवाल अपघात स्थळावर प्रत्यक्षदर्शींनी उपस्थित केला. तर, काहींनी त्या ॲम्बुलन्स मृतदेह उचलत नाही, असा शेरा मारला.

Accident News
Jalgaon Crime News : जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 13 संशयितांवर गुन्हा दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com