आपत्कालीन रुग्णवाहिका व्यवस्था

मोठ्या शहरात खूप सुधारणा झाली; पण छोट्या शहरांत व ग्रामीण भागात रुग्णवाहिका सेवा जास्त सक्षम करण्याची गरज
dr avinash supe Emergency Ambulance Arrangements empower ambulance services in small towns and rural areas
dr avinash supe Emergency Ambulance Arrangements empower ambulance services in small towns and rural areassakal

- डॉ. अविनाश सुपे

प्रत्येकाचा जीवनप्रवास हा जन्मापासून मृत्यूकडे असतो, तर रुग्णवाहिकेतील रुग्णाचा प्रवास हा मृत्यूकडून जगण्याकडे असतो. लोकांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून रुग्णवाहिकेचा सायरन ऐकून रस्ता मोकळा करून दिला पाहिजे; तरच ही आपली जीवनदायिनी रुग्णवाहिका महत्त्वाची कामगिरी बजावू शकतील. मोठ्या शहरात खूप सुधारणा झाली; पण छोट्या शहरांत व ग्रामीण भागात रुग्णवाहिका सेवा जास्त सक्षम करण्याची गरज आहे.

मा झे शिक्षक डॉ. रवी बापट हे १९८४ मध्ये रशियन एम्बॅसी-दूतावासामार्फत रशिया बघायला गेले होते. मॉस्को आणि इतर शहरे बघून ते अत्यंत प्रभावित झाले. रोज वॉर्डच्या राऊंडवेळी ते आम्हाला तिथल्या सुरस कथा सांगायचे.

त्या कथांमधील एक गोष्ट माझ्या मनात घर करून राहिली, ती म्हणजे तेथील अत्यंत शिस्तबद्ध आणि तत्पर रुग्णवाहिका सेवा. इतका मोठा देश आणि त्यामानाने जुन्या इमारती व दाट लोकवस्ती, तरीही तिथे आपत्कालीन वेळी रुग्णवाहिका सहा ते सात मिनिटांत पोहचत असे.

dr avinash supe Emergency Ambulance Arrangements empower ambulance services in small towns and rural areas
Civil Hospital : जिल्हा रुग्णालयात 2 तास वीज गायब; उपकरणे बंद झाल्याने रुग्णांची गैरसोय

कोणाच्या छातीत दुखू लागले आणि ॲम्ब्युलन्ससाठी फोन केला की सहा-सात मिनिटांत डॉक्टरसह रुग्णवाहिका दारात येते. ही रुग्णवाहिका सर्व साधनांनी परिपूर्ण असते. जीव वाचविण्यासाठीची सुविधा असल्यामुळे रुग्ण रुग्णालयात दाखल करेपर्यंत आवश्यक असलेली प्राथमिक उपचारव्यवस्था रुग्णवाहिकेत मिळून जीव वाचण्याची शक्यता अनेक पटीने वाढते.

मी पुढे अमेरिकेत व इतर देशांत गेलो तेव्हाही तिथे अत्यंत सक्षम रुग्णवाहिका सेवा पाहिली. या व्यवस्थेमुळे एखादी स्त्री अडलेली असेल, हृदयविकारामुळे झटका आला असेल, तर आवश्यक असणारे वैद्यकीय उपचार मिळून पुढे ही रुग्णवाहिका रुग्णाला मोठ्या रुग्णालयात दाखल करते.

dr avinash supe Emergency Ambulance Arrangements empower ambulance services in small towns and rural areas
Good Health : तरुणांनो, सुदृढ रहायचेय, तर तृणधान्ये खा - मानखेडकर

त्यामानाने आपल्या देशात रुग्णवाहिका त्या काळात उपलब्ध नव्हत्या व असल्या तरी त्यांना भरपूर वेळ लागायचा. आपल्या देशात पूर्वी अशा रुग्णवाहिका केवळ काही रुग्णालयाशी संलग्न होत्या; पण आपत्काळात आपल्याला खासगी रुग्णवाहिकांची मदत घ्यावी लागायची.

नंतर प्रगत देशांसारखी ॲम्ब्युलन्स व्यवस्था करण्यासाठी आपण यासाठी सतत प्रयत्नरत आहोत. आपण १०८ नंबर ॲम्ब्युलन्स बोलावण्यासाठी दिलेला आहे. मुंबईत तरी १०-१५ मिनिटे किंवा कमी वेळेत रुग्णवाहिका येते; पण गावांमध्ये अजूनही रुग्णवाहिका थांबे लांब असल्यामुळे रुग्णवाहिका पोचायला एक तास, दोन तास असा कितीही वेळ लागतो.

रुग्णवाहिकेत ॲलोपॅथीशिवाय इतर पॅथीचे डॉक्टर्स असतात, ज्यांना आपत्कालीन उपचारांबाबत प्रशिक्षित केलेले असते. ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटातील एक वाक्य फार बोलके आहे. ‘‘अपने देश में पिझ्झा ३० मिनिट्स में पोहोचने की गॅरंटी है लेकिन ॲम्ब्युलन्स?’’

dr avinash supe Emergency Ambulance Arrangements empower ambulance services in small towns and rural areas
Pune Lok Sabha Election : मतदारसंघ निहाय निवडणूक प्रमुखांची यादी जाहीर; पुणे लोकसभेचे निवडणूक प्रमुख मुरलीधर मोहोळ

सरकारने आता ही सेवा सक्षम बनविण्याचा सतत प्रयत्न सुरू केला आहे. १०८ क्रमांक डायल करताच ऑक्सिजन सिलिंडर, कृत्रिम श्वसन यंत्रणा, औषधे यांनी युक्त व सोबत डॉक्टर असलेली रुग्णवाहिका रुग्णाकडे पोचेल, असे राज्य सरकार सतत प्रयत्न करीत आहे.

आमच्याकडे केईएम रुग्णालयात जेव्हा खूप दुरून मिरा रोड, भाईंदर, मुरबाड येथून गंभीर रुग्ण रुग्णवाहिकेतून येतात, तेव्हा ते काही वेळा अधिक गंभीर किंवा मृतावस्थेत असतात. कारण लागणारा वेळ, रस्ते खराब, रस्त्यावरील वाहनांची कोंडी, रुग्णवाहिका अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज नसणे,

असली तरी त्यातील उपकरणे नादुरुस्त, अर्हताप्राप्त प्रशिक्षित कर्मचारी रुग्णवाहिकेत उपलब्ध नसणे अशी अनेक कारणे असतात. नातेवाईकांच्या अडचणी रुग्ण जेव्हा मृतावस्थेत पोचतो तेव्हा वाढतात. कारण मृत्यूचा दाखला कोण देणार? पोलिस केस होते. कुठच्या पोलिस हद्दीत प्रकरण येते, बदलापूर की परळ, नीट माहिती मिळत नाही आणि रुग्णांच्या नातेवाईकांची ससेहोलपट होते.

या गैरसोयीची मुख्य कारणे म्हणजे आपली प्रचंड लोकसंख्या. अपुऱ्या रुग्णवाहिका, खोदलेले रस्ते व ट्रॅफिक जाम इत्यादी. कितीही साधने उपलब्ध केली, तरी अपुरी पडतात. मी अधिष्ठाता आणि सर्व रुग्णालयांचा संचालक होतो, तेव्हा सर्वांशी सल्लामसलत करून एक तोडगा काढला होता.

रुग्णवाहिकांचा जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम) जी वापरकर्त्यांना त्या वाहनांचा ठावठिकाणा सांगते. तसेच जीपीएसमुळे रस्त्यावर एक मार्ग मोकळा करणे सोयीचे होते. १०८ क्रमांक डायल झाल्यावर तो कॉल केंद्रात येतो.

यंत्रणेवर डायल करणाऱ्या व्यक्तीचा नंबर येतो. जिल्हा, तालुका वगैरे माहिती नोंद केली जाते. जिथून कॉल आला तेथील रुग्णवाहिका नकाशावर दिसू लागतात. डॉक्टर आणि कॉलर यांच्याशी बोलणेपण केले जाते. कॉलरला वाहन क्रमांक आणि डॉक्टरचा नंबर एसएमएस केला जातो आणि रुग्णवाहिका इच्छितस्थळी पोचते. असे मोबाईल ॲपही तयार केलेले आहे.

ट्रॅफिक कमिशनर असताना मिलिंद भारंबे या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी यकृत, हृदय प्रत्यारोपण इत्यादी वेळेचे बंधन असणाऱ्या शस्त्रक्रियांसाठी विमानतळ ते रुग्णालय असा एक अत्यंत कमी वेळेचा मार्ग तयार करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली.

याला ग्रीन कॉरिडॉर असेही म्हणतात. ‘ग्रीन कॉरिडॉर’ हा एक विशेष मार्ग आहे जो अशा प्रकारे व्यवस्थापित केला जातो की, ज्या रुग्णालयाच्या मार्गावर अवयव काढले जातात आणि ज्या रुग्णालयात त्याचे प्रत्यारोपण केले जाणार आहे त्या मार्गावर येणारे सर्व ट्रॅफिक सिग्नल्स हिरवे असतात. मॅन्युअली नियंत्रित केले जातात. त्यांनी सुरुवात केलेली ही व्यवस्था अजूनही कार्यरत आहे. त्यामुळे भारंबे आणि त्यांच्या व सर्व पोलिस सहकाऱ्यांचे खूप कौतुक केले पाहिजे.

आरोग्य व्यवस्थेचा एक मुख्य भाग म्हणजे उत्तम सुसज्ज आणि कधीही उपलब्ध असणारी रुग्णवाहिका. रुग्णांना घरून रुग्णालयात, एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात हलविणे, आपत्कालीन वैद्यकीय सेवेत आणीबाणीच्या परिस्थितीत रुग्णालयाचे कामही ती करते.

रुग्ण जीवन-मरणाच्या दारात असताना त्या सोनेरी घटका रुग्णवाहिकेचे महत्त्व प्रत्येकाला जाणवून देतात. प्रत्येकाचा जीवनप्रवास हा जन्मापासून मरणाकडे असतो; तर रुग्णाविहिकेतील रुग्णाचा प्रवास हा मरणाकडून जगण्याकडे असतो.

म्हणूनही रुग्णवाहिकेवर ॲम्ब्युलन्स हे नाव उलटे लिहिलेले दिसून येते. लोकांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून रुग्णवाहिकेचा सायरन ऐकून रस्ता मोकळा करून दिला पाहिजे आणि रुग्णवाहन चालकांनी केवळ सायरन आहे म्हणून रुग्ण नसताना तो वाजवू नये; तरच ही आपली जीवनदायिनी रुग्णवाहिका अपघात, आगीच्या दुर्घटना, हृदयविकार, प्रसूतिकालीन मदत अशा विविध घटनांमध्ये महत्त्वाची कामगिरी करू शकतील.

वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत, वेळ फार महत्त्वाची असते. रुग्णवाहिका सेवा रुग्णांना तत्काळ वैद्यकीय सेवा प्रदान करतात. प्रथमोपचार प्रदान करून आणि रुग्णाची स्थिती स्थिर करून, रुग्णालयात त्वरित पोहोचवते. मोठ्या शहरात गेल्या १० वर्षांत खूप सुधारणा झाली आहे; पण छोट्या शहरात व ग्रामीण भागात रुग्णवाहिका सेवा जास्त सक्षम करण्याची गरज आहे.

(लेखक केईएम रुग्णालयातून अधिष्ठातापदावरून निवृत्त झाले असून त्यांचे ‘सर्जन’शील हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com