हळद फिटण्याआधीच कुंकू रुसले; मन सुन्न करणारी घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

accident

हळद फिटण्याआधीच कुंकू रुसले; मन सुन्न करणारी घटना

सावदा (जि. जळगाव) : घराच्या अंगणी पार पडलेल्या लग्नातील सनई- चौघडा यांचे स्वर निनादत असतानाच अचानक त्या घरातून आक्रोशाच्या किंचाळ्या येऊ लागल्याने समाजमन सुन्न झाले आहे, वधूच्या अंगावरील हळदीचा रंग व हातावरील मेहंदी जशीच्यातशी असताना तिच्या कपाळावरील कुंकू पुसण्याची वेळ आली आहे. वऱ्हाडी मंडळी लग्नाच्याच चर्चेत गुंग असताना या कुटूंबावर काळाने मोठा आघात केला आहे.

सनई चौघड्यांचा आवाज अजूनही घरात निनादतोय

दिपनगर (ता. भुसावळ) येथील पॉवर हाउसमध्ये नोकरीवर असलेल्या सचिनचे लग्न आठ दिवसआधीच मोठ्या थाटामाटात आप्तेष्ट मित्र परिवाराच्या साक्षीने भोकरी (ता. मुक्ताईनगर) येथे संपन्न झाले होते. या लग्न सोहळ्यातील वर- वधुच्या अंगावरची हळद अजून उतरायचीच होती, सनई चौघड्यांचा आवाज अजूनही घरात निनादत होता. वऱ्हाडी मंडळी लग्नाच्या चर्चेत गुंग असताना काळाने घात केला. कामावरून घरी परतत असताना झालेल्या दुर्दैवी अपघातात नव वरांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा: ...माणसाला मरण नाही!

गुरुवारी (ता. ३०) दीपनगर येथून कामावरून घरी परतत असताना फुलगावच्या ओव्हर ब्रिजजवळ रात्री साडेदहाच्या दरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत सचिन चिंतामण चौधरी (वय. २६, रा. उदळी) याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरासह संपूर्ण तालुक्‍यात हळहळ व्यक्त होत आहे.

परिवारासह पंचक्रोशी सुन्न

सचिन याचा विवाह मोठ्या थाटामाटात आप्तेष्ट व रीतीरिवाजाप्रमाणे पार पडला. नव दाम्पत्याच्या अंगावर हळद ओली होती. हातावर मेंदी सजलेली होती, संसार वेल बहरण्याच्या मार्गावर होती त्यात काळाने घात केला. कानात शिसे ओतल्याप्रमाणे उदळीत दुर्दैवी घटनेची बातमी आल्याने सगळा परिवार सुन्न झाला. ३० डिसेंबर रोजी दीपनगर येथून कामावरून घरी येत असताना रात्री साडेदहाच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान, शुक्रवारी (ता. ३१) रोजी दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.


हेही वाचा: ATM मधून पैसे काढताय? जास्त व्यवहारांसाठी द्यावं लागणार इतके शुल्क

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top