Jalgaon News : महासभा नव्हे ‘मुक्तसभा’... नगरसेवक बोलले मनसोक्त; भंगारबाजारावर वाद

jalgaon municipal corporation
jalgaon municipal corporationesakal

जळगाव: महापालिकेच्या नगरसेवकांना टर्म संपण्याचे वेध लागले आहेत. बुधवारी (ता. १५) झालेल्या महासभेत नगरसेवक आपापल्या भागातील समस्यांवर अगदी मनसोक्त बोलले.

पीठासीन अधिकारी महापौर जयश्री महाजन (Jayshree Mahajan) यांनीही त्यांना वेळेच बंधन आडवे आणले नाही. (In Mahasabha corporators spoke passionately about problems in their areas Mayor did not oblige jalgaon news)

अगदी सर्वांचे बोलणे संपल्यावर दोन तासांनी प्रश्‍नोत्तरे आणि विषयपत्रिकेवरील मूळ विषयाला सुरवात झाली. विविध भागातील रस्त्यांच्या कामांचा मुद्या गाजला.

डीमार्ट रस्त्याच्या मोजमापचा मुद्याही गाजला, तर भंगारबाजार हटविणाऱ्यावरून कैलास सोनवणे व इब्राहिम पटेल यांच्यात शाब्दिक चकमक झाली. विषयपत्रिकेवरील दोन विषय नामंजूर करण्यात आले, तर इतर विषय एकमताने मंजूर करण्यात आले.

महापालिकेची महासभा सतरा मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात सकाळी अकराला सुरू झाली. पीठासीन अध्यक्षपदी महापौर जयश्री महाजन होत्या. व्यासपीठावर उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते.

प्रारंभी केवळ चर्चा आणि चर्चाच

सभा सुरू झाल्यानंतर सदस्यांनी शहरातील रस्त्यांच्या प्रश्‍न उपस्थित केले आणि त्यानंतर प्रत्येक सदस्याने आपापल्या भागातील समस्या मांडल्या. महापौरांनी काही सदस्यांना मज्जाव केला. मात्र, ‘सदस्यांनी आमच्या समस्या मांडू द्या’, असा आग्रह धरला. त्यानंतर महापौर जयश्री महाजन यांनी सदस्यांना रोखण्याचा फारसा प्रयत्न केला नाही.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

jalgaon municipal corporation
Sakal Impact : 17 मजलीतील भंगाराचे गुदाम इतरत्र हलविणार; ‘सकाळ’ वृत्ताची दखल

तब्बल दोन तास प्रत्येक सदस्य आपल्या भागातील समस्या मांडत होते. विषयपत्रिकेवरील कोणतेही विषय होत नव्हते. त्या वेळी नितीन लढ्ढा म्हणाले, की अध्यक्ष महोदया, आज सर्व सदस्यांना मुक्तपणे बोलू द्या. सर्व सदस्यांच्या भावना मोकळ्या होऊ द्या. त्यानंतर विषयपत्रिकेवरील विषय आपण घेऊ.

सर्वच सदस्यांना बोलू द्या. सर्वांचे विषय संपल्यावर दुपारी चारला आपण पत्रिकेवरील विषय घेऊ, असे विष्णू भंगाळे म्हणाले. सदाशिव ढेकळे म्हणाले, की मी सभागृहात गेली नऊ टर्म आहे. पण सभागृहात असे मी कधीच बघितले नाही. सर्वच जण बोलत आहेत. मात्र, विषयपत्रिकेवरील विषयाची सुरवात कधी होईल, असा प्रश्‍न कैलास सोनवणे यांनी उपस्थित केला.

सदस्यांच्या बोलण्यावर चर्चा सुरू असताना, महापौर जयश्री महाजन यांनी आता बोलणे बंद करा. विषयपत्रिकेवरील विषय घ्या, असे दरडावून सांगितले. तरीही काही सदस्य ‘आम्हाला बोलू द्या, आमचे विषय मांडू द्या’, असा आग्रह करीत बोलतच राहिले. त्यानंतर महापौरांनी सर्वांना मुक्तपणे आपले प्रश्‍न मांडू दिले.

jalgaon municipal corporation
Jalgaon News : जन्मदात्याकडून बालिकेचा विनयभंग

रस्त्याच्या कामाचा मुद्दा गाजला

शहरातील रस्त्याच्या प्रश्‍नांवर चर्चा झाली. भाजपचे जितेंद्र मराठे यांनी शहरातील रस्त्यांची कामे होत आहेत. मात्र, काही भागात काम झाल्यावर काही महिन्यात ते उखडले जात आहेत. त्याची जबाबदारी कोणाची, असा मुद्दा उपस्थित केला.

शिवसेनेचे नितीन लढ्ढा यांनी रस्त्यांसाठी कोटीच्या कोटी रुपये मंजूर होत आहेत. मात्र, ही कामे महापालिकेची परवानगी न घेता परस्पर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कसे जात आहेत, असा प्रश्‍न उपस्थित केला.

शिवसेनेचे नगरसेवक नितीन बरडे यांनी महाबळ कॉलनीतील रस्त्याचे काम निकृष्ट असल्याने संबंधित मक्तेदारावर कारवाई का करीत नाही, असा प्रश्‍न उपस्थित केला. या निकृष्ट कामाला नगरसेवकांचा पाठिंबा असल्याचे नागरिक संशय घेत आहेत.

त्यामुळे प्रशासनाने ताबडतोब कारवाई करावी. नगरसेवक मनोज चौधरी यांनी चंदूअण्णानगर भागातील रस्त्याचे काम न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला.

jalgaon municipal corporation
Jalgaon News : ओडिशाच्या गांजाची महाराष्ट्राला ‘धुंद’... तस्कराला अटक

डीमार्ट रस्ता चर्चेत, मोजमाप समिती

इच्छादेवी चौक ते डीमार्ट रस्त्याच्या कामाबाबत माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी पाहणी केली होती. त्या ठिकाणचे अतिक्रमण काढून काम सुरू करा, असे मत त्यांनी मांडले. या विषयावर महासभेतही जोरदार चर्चा झाली.

भाजपचे राजेंद्र घुगे-पाटील, सदाशिव ढेकळे, नितीन लढ्ढा यांनी त्या विषयावर चर्चा केली. राजेंद्र घुगे पाटील म्हणाले, ‘इच्छादेवी चौक ते डीमार्ट रस्ता अत्यंत खराब झाला आहे. दुरुस्तीच्या मागणीनंतर त्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, आता अतिक्रमणाच्या आरोपावरून ते थांबविले आहे. काम सुरू होण्याअगोदरच हा प्रश्‍न का उपस्थित केला नाही.

ते अतिक्रमण का काढले नाही, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. नितीन लढ्ढा यांनी हा रस्ता काही ठिकाणी कमी-जास्त भरत आहे. मात्र, तो विकास आराखड्यातच तसा आहे. डीमार्टजवळ अतिक्रमण असल्याचे दिसत नाही.

मात्र, शहरातील रस्ते डीपीअंतर्गत मोजमाप करण्यासाठी नगररचना अधिकारी करवंदे यांच्या नेतृत्वाखाली समिती तयार करावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यावर डीमार्ट रस्त्याचे मोजमाप करावे.

jalgaon municipal corporation
Jalgaon News : रेल्वेखाली आल्याने तरुण जागीच ठार

त्या ठिकाणी अतिक्रमण असल्यास ते काढून तत्काळ काम सुरू करावे, असे आदेश महापौर जयश्री महाजन यांनी दिले. सदाशिव ढेकळे यांनी त्वरित मोजमाप व्हावे, अशी मागणी केली.

भंगारबाजारावर शाब्दिक चकमक

अजिंठा चौफुलीवरील भंगारबाजार हटविण्यावरून शिवसेनेचे नगरसेवक इब्राहिम पटेल व भाजपचे नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यांत शाब्दिक चकमक झाली. इब्राहिम पटेल म्हणाले, की एक हजार लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न आहे, तसेच ही जागा आम्हाला सुरेशदादा जैन यांनी दिली आहे. त्या काळात त्या ठिकाणी कोणीही जात नव्हते.

आम्हाला शिवाजीनगर, हुडकोत घरे दिली आणि भंगारबाजारासाठी ही जागा दिली आहे. भंगारबाजार हटविला, तर आमच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण होईल. आम्ही पोराबाळांसोबत महापालिकेत आंदोलन करू. त्या वेळी जे होईल त्याची जबाबदारी प्रशासनाची असेल. त्यावर कैलास सोनवणे म्हणाले, की धमक्या देऊ नका.

हा बाजार हटविण्याचा निर्णय नियमाप्रमाणे आहे. त्यामुळे कोणत्याही सदस्याने आकांडतांडव करू नये. गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे हा विषय प्रलंबित होता. त्यावर आता कारवाई होत आहे. मूळ गाळेधारकांना जागा देऊन या बाजारावर कारवाई करा, असे मतही त्यांनी व्यक्त केले. या वेळी दोघांत शाब्दिक चकमक झाली. मात्र, नितीन लढ्ढासह इतर नगरसेवकांनी मध्यस्थी केल्याने हा वाद मिटला.

Airline Service : जळगावची विमानसेवा 11 महिन्यांपासून ठप्प

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com