Jalgaon : पोलिस कर्मचारी-अधिकाऱ्यांमध्ये घमासान

police
policeesakal

जळगाव : शहरातील रामानंदनगर पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. १८) दुपारी पोलिस कर्मचारी (Police Officers) आणि उपनिरीक्षकात (PSI) घमासान हाणामारी झाल्याची घटना घडली. या हाणामारीत चक्क फौजदारांच्या डोक्यात खुर्ची (Chair) घालण्यात आली. याप्रकरणी कुठलीच नोंद नसली तरी, सहाय्यक पोलिस अधीक्षकांच्या दालनात उशिरापर्यंत दोघांना घेउन निरीक्षक विकास शिंदे हजर होते. (dispute among police personnel officers Jalgaon News)

प्राप्त माहितीनुसार, विशाल राजेंद्र चोपडा (रा. श्रीकृष्ण कॉलनी) यांच्यासह विविध पाच प्लॅटधारकांनी गुरुवारी (ता. १६) सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांना लेखी तक्रारी अर्ज सादर केला होता. त्यात नमुद केल्याप्रमाणे, तक्रारदारांनी नुर मोहम्मद अब्दुल गफूर व मरियम बी अब्दुल गफूर या दोघांविरुद्ध फसवणूक झाल्याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला असून या तक्रारीची चौकशी करणाऱ्या अनमोल पटेल यांच्याकडून तपास काढून कुठल्याही इतर अधिकाऱ्याकडे द्यावा, अशी मागणी करण्यात आली. त्यानुसार सहाय्यक अधीक्षकांनी तसे आदेश केले होते. या प्रकरणात पिंप्राळा येथील प्लॉटचा मुळ मालक बिल्डर व डेव्हलपर आणि फ्लॅट विकत घेणाऱ्यांमध्ये वाद आहे. या वादात तपास आता उपनिरीक्षक देशमुख करत असून त्यांनी संशयिताला बोलावणे केल्याने उपनिरीक्षक देशमुख आणि अनमोल पटेल यांच्यात हाणामारी झाली.

police
22 वर्षांच्या गॅप नंतर दहावी उत्तीर्ण; आई व मुलाने सोबत मिळविले यश

फसवणुकीची तक्रार

पोलिस ठाण्यात प्राप्त लेखी तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे संशयित जागा मालक नूर मोहम्मद अब्दुल गफूर याने सौदा पावती केल्यानंतर जागा नावावर करुन देण्यासाठी अतिरिक्त पैशांची मागणी केल्याच्या तक्रारीची चौकशी उपनिरीक्षक देशमुख यांच्याकडे आल्यावर त्यांनी संबंधिताला बोलावणे केले. मात्र, मला अनमोल पटेल यांनी मोबाईल बंद करून ठेवण्याच्या सूचना केल्याचे देशमुखांना सांगितले.

police
ठेंगोड्यात भंगार दुकानास आग; 5 लाखांचे नुकसान

खुर्ची टाकली डोक्यात

या प्रकरणात आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचा संशय असून तपासात देशमुख यांनी खोदकाम सुरु केल्यामुळे शनिवारी सकाळी पोलिस ठाण्यात देशमुख आणि अनमोल पटेल यांच्यात वाद होऊन अनमोल पटेल याने उपनिरीक्षक देशमुख यांच्या डोक्यात खुर्ची टाकली. त्यानंतर निरीक्षक विकास शिंदे यांच्या केबिनमध्ये दोघांमध्ये पुन्हा हाणामारी झाल्याची घटना घडली. त्यानंतर सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्याकडे चौकशीसाठी विचारपूस सुरु होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com