मेहूणीच्या साखरपुड्यानंतर 'तो' ढसाढसा रडला, कारण ऐकून बायकोला बसला धक्का

एक व्यक्ती चक्क आपल्या मेहूणीच्या साखरपुड्यानंतर खुप रडला आणि आश्चर्याचं म्हणजे जेव्हा बायकोला त्याच्या रडण्यामागील कारण समजले तेव्हा तिला धक्काच बसला.
viral
viralsakal

मुलीचं लग्न हा प्रत्येकासाठी खुप हळवा क्षण असतो. मुलगी सासरी जाते तेव्हा प्रत्येकाला रडू येतं. पण सध्या सोशल मीडियावर एक प्रकरण बरंच गाजतयं. एक व्यक्ती चक्क आपल्या मेहूणीच्या साखरपुड्यानंतर खुप रडला आणि आश्चर्याचं म्हणजे जेव्हा बायकोला त्याच्या रडण्यामागील कारण समजले तेव्हा तिला धक्काच बसला.

viral
Viral Photo: धर्मेंद्र यांची पहिली पत्नी सोशल मीडियावर!

या महिलेने स्वत: आपल्या नवऱ्याबद्दल सोशल मीडियावर सांगितले. महिला म्हणते, तिच्या बहिणीच्या साखरपुड्यानंतर तिच्या नवऱ्याच्या वागण्यात तीला खुप बदल जाणवला. एकदा दारूच्या नशेत त्याने तिला रडण्यामागील कारणही सांगितलं.

viral
Viral : कबूल है! लग्नसोहळ्यानंतर नवरदेव शौचालयातूनच फरार

महिला सांगते, माझी बहीण एका तरुणाला डेट करत होती जे माझ्या नवऱ्याला बिलकुल आवडलं नाही. त्याने मला तो मुलगा तिच्यासाठी ठिक नाही, असे कित्येकदा सांगितले. एके दिवशी मी, माझा नवरा, माझी बहीण आणि तिचा बॉयफ्रेंड चौघंही जेवायला गेलो, त्यावेळी माझ्या बहिणीला तिच्या बॉयफ्रेंडने प्रपोज केलं आणि त्यांनी साखरपुडा केला.

त्यानंतर आम्ही घरी आलो. तेव्हा माझा नवरा एका खोलीत खुप रडत होता. नवऱ्याला रडताना पाहून मला काहीच सुचले नाही पण जेव्हा मी त्याला का रडतोस असे विचारले, तेव्हा तो माझ्या बहिणीवर खूप प्रेम करत असल्याचं समजलं आणि मला धक्काच बसला.

viral
Viral Photo: धर्मेंद्र यांची पहिली पत्नी सोशल मीडियावर!

माझ्या नवऱ्याचं माझ्या बहिणीवर एकतर्फी प्रेम आहे. तिला आता काय करावं हे समजत नाही. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल सांगितले. सध्या तिच्या या पोस्टवर लोक अनेक प्रतिक्रिया देत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com