Road Construction : चाळीसगावातील निकृष्ट रस्त्याच्या चौकशीचे आदेश; जिल्हाधिकाऱ्यांकडून तक्रारीची दखल | district collector Order of inquiry into poor road in Chalisgaon jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Road construction

Road Construction : चाळीसगावातील निकृष्ट रस्त्याच्या चौकशीचे आदेश; जिल्हाधिकाऱ्यांकडून तक्रारीची दखल

Jalgaon News : शहरातील करगाव नाका रेल्वे बोगदा ते आर. के. लॉन्स, अभिनव शाळेपर्यंतच्या भडगाव रस्त्यापर्यंत सुमारे १ कोटी २० लाख रुपये अंदाजपत्रकीय खर्चानुसार काम होत नसून, संबधित ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याची तक्रार येथील प्रेस क्लबचे अध्यक्ष रामलाल चौधरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.

त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले असून, संबंधित ठेकेदाराला १३ लाख ३५ हजार रुपयांच्या दंडाची नोटीस काढली आहे. (district collector Order of inquiry into poor road in Chalisgaon jalgaon news)

चौधरी यांनी तक्रारीत म्हटले आहे, की या रस्त्याचे सुरुवातीला खडीकरण केले जात आहे. यासाठी शेकडो ब्रास खडी व मुरूमचा वापर होत आहे.

शासनाकडून गौणखनिज उत्खननावर बंदी असताना या रस्त्याच्या कामासाठी दगड, खडी व मुरूम कुठून आणला गेला? यासाठी संबंधित ठेकेदाराने महसूल प्रशासनाची परवानगी घेतली आहे काय? किंवा शासकीय परमिट अथवा चलन भरले आहे काय? या संदर्भातल्या पावत्या अथवा बिलांची माहिती चौधरी यांनी १३ एप्रिल २०२३ ला येथील महसूल प्रशासनाकडे लेखी तक्रार देऊन केली होती.

त्याची दखल घेत त्या रस्त्यावर वापरण्यात आलेली खडी व मुरूमचा पंचनामा शहर तलाठी यांनी पंचासमक्ष केला गेला असता, संबधित अधिकाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नसल्याचा अहवाल सादर करण्यात आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यामुळे रस्त्याच्या पहिल्या टप्प्यात जवळपास १०० ब्रास खडी व २५ ब्रास मुरूम विना परवानगीचे वाहतूक केल्याप्रकरणी संबंधित एजन्सीचे ठेकेदार स्वप्नील अमृतकर तसेच प्रशांत कुमावत यांना १५ मेस १३ लाख ३५ हजार रुपयांची दंडाची नोटीस काढण्यात आली आहे.

याच रस्त्याच्या कामासाठी अजूनही मोठ्या प्रमाणावर दगड व मुरूमचा वापर होत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाच्या वस्तुस्थितीदर्शक अहवालानंतर पुन्हा दंडाच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे. सुरुवातीपासूनच या रस्त्याचे निकृष्ट व बोगस काम होत असल्याचे तक्रारी वेळोवेळी पालिका प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिले आहेत. तरी देखील पालिकेने याबाबतचे गांभीर्य घेतलेले नाही.