Jalgaon District Collector : उपाययोजनांसह सादर करा आपत्ती व्यवस्थापन आराखडा : जिल्हाधिकारी प्रसाद

Jalgaon District Collector Ayush Prasad
Jalgaon District Collector Ayush Prasad esakal

Jalgaon District Collector : मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हा आपत्ती निवारण आराखडा तयार करून पुढील आठवड्यात शासनाला सादर करण्यात येणार आहे.

यासाठी शासकीय विभागांनी समन्वय ठेवत तत्काळ उपाययोजनांसह आराखडा सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी येथे दिल्या.

जिल्हा आपत्ती सौम्यीकरण प्रस्ताव सादर करण्याबाबत शनिवारी (ता. २६) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. (district collector prasad instruct to Submit disaster management plan with measures jalgaon news)

आपत्ती व्यवस्थापन सल्लागार डॉ. प्रशांत वाघमारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरसिंह रावळ, चंद्रकांत गवळी यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले की, १५ व्या वित्त आयोगाद्वारे राज्यात उद्‌भवणाऱ्या विविध आपत्तींचे सौम्यीकरण करणेसाठी निधी मंजुर केलेला आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यांमधील विविध आपत्तीमुळे होणारी जिवित व वित्त हानी टाळण्याकरीता त्या आपत्तींचे सौम्यीकरण करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात याव्यात.

प्रस्ताव सादर करताना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ६ मार्चला दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास करावा.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jalgaon District Collector Ayush Prasad
Jalgaon News : उंबरखेडला ग्रामस्थांनी जपली ही आदर्श गावाची परंपरा! वर्षभरापासून अव्याहत उपक्रम सुरू

धोके जोखीम, मुल्यमापन, आपत्तीमुळे बाधीत होणारे घटक, आपत्ती प्रवण विभागातील जनसामान्यांचे विचार, प्रश्‍नावली, अंदाजीत खर्च, नकाशा, प्रोजेक्ट प्लॅन आणि प्रस्ताव सादर करताना सखोल अभ्यास करुनच प्रस्ताव सादर करण्यात यावा अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

प्रत्येक विभागाचे सादरीकरण

कोणत्याही आपत्कालीन प्रसंगात प्रतिबंधात्मक उपाययोजना, आपत्ती सौम्यीकरण, तत्काळ प्रतिसाद, मदत व पुनर्वसन, कार्यकारी यंत्रणांशी समन्वय करावयाचे निर्देश आहेत. त्यानुसार प्रत्येक विभागातर्फे सादरीकरण करण्यात आले.

जिल्हा परिषद, महानगरपालिका, अधीक्षक अभियंता, महावितरण, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ, जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद ग्रामीण विकास विभाग, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Jalgaon District Collector Ayush Prasad
Jalgaon People Bank : दि जळगाव पीपल्स बँकेमध्ये ‘अकोला मर्चंट’चे विलीनीकरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com