Jalgaon News : खानदेशासाठी जळगावात विभागीय कार्यालय; मुख्यमंत्र्याची घोषणा

Jalgaon News : खानदेशासाठी जळगावात विभागीय कार्यालय; मुख्यमंत्र्याची घोषणा
esakal

जळगाव : खानदेशातील जळगाव, धुळे, नंदुरबार तीन जिल्ह्यासाठी अमरावतीच्या धर्तीवर जळगाव येथे विभागीय (Divisional) कार्यालय सुरू करण्यात येईल. चोपडा, धरणगाव, पाचोरा, मुक्ताईनगर, एरंडोल येथे औद्योगिक वसाहत स्थापन करण्यात येईल. (divisional office will be opened at on lines of Amravati for 3 districts of Khandesh Dhule Nandurbar jalgaon news)

तर जिल्ह्यातील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी देण्यात येईल. केळीवर आधारित उद्योगासाठी प्रोत्साहन देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगाव जिल्ह्यातील भोकर येथे बोलताना केली.

जळगाव जिल्ह्यातील भोकर येथे तापी नदीवर उभारण्यात येणाऱ्या पुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत, खनिकर्म मंत्री दादा भुसे, पाणीपुरवठा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री

गुलाबराव पाटील, खासदार रक्षा खडसे, उन्मेश पाटील, आमदार लता सोनवणे, सुरेश भोळे, संजय सावकारे, चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अनिल पाटील, माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे आदी उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम अभियंता पी.पी. सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. गुलाबराव पाटील, आमदार लता सोनवणे, प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्याहस्ते मुख्यमंत्र्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिल्प देवून सत्कार करण्यात आला.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

Jalgaon News : खानदेशासाठी जळगावात विभागीय कार्यालय; मुख्यमंत्र्याची घोषणा
Uday Samant | उद्योगमित्र बैठक दर आठवड्याला घेण्याचा अध्यादेश काढणार : उदय सामंत

निधी कमी पडू देणार नाही

मुख्यमंत्री म्हणाले, जिल्ह्यातील विकासासाठी आपण कोणत्याही प्रकारे निधी कमी पडू देणार नाही. मायबाप शेतकऱ्यांच्या जीवनात आपण कोणतीही अडचण येवू देणार नाही. जळगाव जिल्ह्यातील वाघूर प्रकल्पाला एक हजार कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता मागेच दिली आहे.

नार पार प्रकल्पही मार्गी लावण्यात येईल. पाडळसरे (निम्न तापी) प्रकल्पाल मार्गी लावण्यात येईल, त्यासाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात येईल. यावल येथील उपसा सिंचन योजनेचा प्रकल्पही मार्गी लावण्यात येईल.

त्यासाठी ५९२ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचे ते म्हणाले. गिरणा नदीवरील सात बलून बंधाऱ्यासाठी शंभर कोटी रुपयाचा निधी देणार आपले सरकार स्थापन झाल्यापासून राज्यात २२ सिंचन प्रकल्पाला चालना सुप्रमा देण्यात आली आहे.

पाच तालुक्यांत एमआयडीसी

जिल्ह्याचा औद्योगिक विकास करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी चोपडा, एरंडोल, धरणगाव, यावल व मुक्ताईनगर या पाच तालुक्यात औद्योगिक वसाहत स्थापन करण्याची ग्वाही केली.

Jalgaon News : खानदेशासाठी जळगावात विभागीय कार्यालय; मुख्यमंत्र्याची घोषणा
BHR Case : ॲड. चव्हाण, सोनाळकरांना अटकपूर्व जामीन मंजूर; पुराव्यांवर अवलंबून

केळीपासून उद्योगासाठी प्रोत्साहन

जळगाव जिल्ह्याचे मुख्य पीक केळी असल्याचा उल्लेख करून मुख्ममंत्री म्हणाले, केळी पिकावर आधारित उद्योगासाठी आपले प्रयत्न राहणारा आहे. केळीच्या खोडापासून कापड बनविण्याच्या उद्योगासाठी बाराशे कोटी रुपयांची मंजूरी देण्यात आली असून त्यांचे कामही सुरू झाले आहे.

पोषण आहारात केळीच्या समावेशासाठीही प्रयत्न सुरु आहेत. याशिवाय जिल्ह्यात वारकरी व लोककला भवन उभारण्यात येईल. तसेच खानदेशला विशेष पॅकेज देण्यात येईल. महसूल तसेच विविध कामाच्या सुसुत्रततेसाठी विभागीय कार्यालयाची आवश्‍यकता असते.

अमरावती येथे तीन जिल्ह्याचे विभागाय कार्यालय सुरु केले आहे, त्याच धर्तीवर जळगाव येथे जळगाव, धुळे, नंदुरबार या तीन जिल्ह्यासाठी कार्यालय उभारण्यात येइल.

विकासाला निधी द्यावा : गुलाबराव

गुलाबराव पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी आमच्या जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष द्यावे, जिल्ह्यात महत्त्वाचे पिक केळी आहे, त्याला पोषण आहाराचा दर्जा द्यावा, शेतकऱ्यांच्या कापसाला भाव द्यावा, जिल्ह्यातील निम्न तापी, यावल उपसा तसेच इतर इतर प्रकल्पाला निधी द्यावा,कोळी समाजाचा प्रश्‍न सोडवावा अशी मागणी केली.

Jalgaon News : खानदेशासाठी जळगावात विभागीय कार्यालय; मुख्यमंत्र्याची घोषणा
Shivsena : शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी हट्ट

ते घरी बसले, शिंदे काम करतात : महाजन

मंत्री महाजन यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाची स्तुती करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ठाकरे मुख्यमंत्री असतांना ते घरी बसले त्यांनी लॅपटॉपवर काम केले, परंतु, एकनाथ शिंदे हे संपूर्ण राज्यभर फिरत असून जनतेत जावून जनतेची कामे करीत आहेत. जनतेचा त्यांना प्रतिसाद मिळत आहे.

प्रकल्प मार्गी लावा : प्रा. चंद्रकांत सोनवणे

माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे म्हणाले, आमच्यावर अनेक संकटे आली, त्यावेळी मुख्यमंत्री आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, आपण त्यांच्याकडे जिल्ह्यातील प्रश्‍नासाठी वेळोवेळी गेलो त्यावेळी त्यांनी सोडविली. जिल्ह्यातील सिचनांचे प्रश्‍न त्यानी सोडवावेत, चोपडा नगरपालिकेला २०० कोटींचा निधी द्यावा,

चोपडा येथे फुड प्रॉडक्ट प्रकल्प उभारावा, जळगाव विमानळाला महर्षी वाल्मीक ऋषी यांचे नाव द्यावे, शेळगाव बॅरेजचा प्रश्‍न सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली.

मंगला बारी आदी कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला त्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्कार केला. सूत्रसंचालन वैशाली पाटील यांनी केले. शाहीर विनोद ढगे आणि मंडळीने ‘गर्जा महाराष्ट्र’ हे गीत म्हटले. सभेला जिल्ह्यातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Jalgaon News : खानदेशासाठी जळगावात विभागीय कार्यालय; मुख्यमंत्र्याची घोषणा
Jalgaon News : डीमार्ट रस्ते कामात सतराशे विघ्न; काँक्रिट झालेल्या रस्त्यावर पुन्हा फिरवला JCB

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com