Jalgaon News: डाॅ. विश्वनाथ पाटलांची तापी नदी उडी घेऊन आत्महत्या

Dr Vishwanath Patil
Dr Vishwanath Patil esakal

Jalgaon News : दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी सर्व नागरीक स्वातंञ्य दिन ध्वजारोहणाच्या तयारीत असतांना सावखेडा निमगव्हाण तापी पुलावरून पाळधी येथील डॉक्टर विश्वनाथ आर पाटील यांनी उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सकाळी सुमारे सहा ते सात वाजेच्या दरम्यान घडली. (Dr Vishwanath Patil committed suicide by jumping into Tapi river Jalgaon News)

सकाळी ध्वजारोहणाकरीता चोपडा येथून पातोंडा माध्यमिक शाळेत नियमीत ये जा करणारे शिक्षक यांनी सावखेडा पुलावर एमएच 19 एपी 4394 क्रमांकाची नॅनो गाडी उभी असल्याचे पाहिले.

तसेच पुलाजवळ गाडीच्या बाजूला बूट काढलेले दिसल्यावर त्यांनी सावखेडा येथील समाजसेवक पंकज पाटील याला सदर संशयास्पद घटनेची माहिती दिली.

सदरची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने तापी नदी पुलावर सावखेडा व निमगव्हाण येथील ग्रामस्थ मदतीकरीता धावले.

या कामी जि.प. सदस्य प्रताप पाटील, निमगव्हाण, तांदळवाडी, सावखेडा व मुंगसे येथील भरत निकम, सुधाकर पाटील, भानुदास पाटील , सावखेडा तलाठी सतीश शिंदे, मंडळ अधिकारी चौधरी, पातोंडा औटपोष्टचे बीट हवलदार संदेश पाटील, सुनील जाधव आदींच्या सहकार्याने दापोरी खु., तांदळवाडी येथून पट्टीच्या पोहणारे विजय भिल, सचिन भिल, समाधान भिल यांनी दापोरी खुर्द, तांदळवाडी ते मठगव्हाण दोंदवाडे गावापर्यंत मृतदेहाचा शोध घेतला.

दुपारी बारा वाजेच्या सुमारास मृतदेह मठगव्हाण गावाच्या काठावर आढळून आला. हवालदार संदेश पाटील, सुनिल जाधव , पो काॅ राहूल पाटील यांनी कायदेशीर कार्यवाही करत मृतदेह शवविच्छेदनाकरीता अमळनेर ग्रामीण रूग्णालयात पाठविला. नातेवाईकांनी सुमारे साडेचार वाजेला मृतदेह ताब्यात घेतला.

सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या व्यक्तीस ऐन म्हातारवयात आत्महत्या का करावी लागली याबाबत चर्चांना उधाण आले आहे. आत्महत्येचे कारण अजून समजले नसून पुढील तपास हवालदार संदेश पाटील व सुनिल जाधव हे करीत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dr Vishwanath Patil
Crime News: धक्कादायक! पुण्यातील मंगला टॉकीजबाहेर तरूणाचा निर्घृण खून; चित्रपट पाहून बाहेर येताच कोयते, तलवार, दगडाने ठेचले

पाळधी व अंजनविहीरे गावावर शोककळा

पाळधी ता.धरणगाव येथील कस्तुरबा रुग्णालयाचे डाॅक्टर विश्वनाथ पाटील हे अनेक वर्षांपासून पाळधी येथे वैद्यकीय व्यवसाय करीत होते. पाळधी येथील जेष्ठ नागरीकांकरीता त्यांनी श्रीराम जेष्ठ नागरीक मंडळाची स्थापना केली आहे.

तर संत तुकाराम महाराज पंचमडळाचे ते अध्यक्ष होते. सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याने दलित मित्र पुरस्कारासह विवीध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या दुःखद निधनाने पाळधी व अंजनविहीरे (ता.धरणगाव) गावावर शोककळा पसरली.

" मी वयाची ऐंशी वर्ष जगलो. जिवनात मी भरपूर कमावले असून माझ्या सर्व अपेक्षा पुर्ण झाल्या आहेत. आता जीवनात मला कोणतीही अपेक्षा शिल्लक नसुन संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या प्रमाणे समाधी घेतली त्याप्रमाणे मी माझ्या जीवनाचा प्रवास स्वतः संपवत आहे. त्याकरिता कुणीही जबाबदार नाही." अशा आशयाची चिठ्ठी डाॅ विश्वनाथ पाटील यांचेसोबत आढळून आल्याची चर्चा उपस्थितांमधे सुरू होती.

Dr Vishwanath Patil
Sanjay Dutt Accident: 'डबल आयस्मार्ट'च्या शूटिंगदरम्यान संजय दत्तचा मोठा अपघात! डोक्याला पडले टाके

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com