Jalgaon News : शहरात पालिका प्रशासनाकडून उधळपट्टी; ‘हायमास्ट’ ठरताहेत शोपिस

Due to the neglect of the municipal administration, the street lights are on even during the day.
Due to the neglect of the municipal administration, the street lights are on even during the day. esakal

Jalgaon News : नगरपरिषद हद्दीतील मालमत्ताधारकांना वाढीव कर आकरण्यात आला आहे. हा वाढीव कर नगररचना विभागाच्या वतीने सर्वेक्षण करून करण्यात आला आहे. पण या कर आकारणीवर हरकत नोंदविण्यात आलेल्या आहेत.

शहरातील नागरिक लागू करण्यात आलेल्या अवाजवी घरपट्टीला त्रासले आहेत. यात नागरिकांच्या माथी पडणाऱ्या करामध्ये उपयोगकर्ता शुल्क म्हणून कर आकारला जातो.

मात्र त्या संदर्भात प्रशासन मात्र ढिम्म असल्याचे दिसून येते. शहरातील मुख्य रस्त्यांवर मात्र दिवसाही पथदिवे सुरुच आहेत. याबाबत अधिकारी मात्र अनभिज्ञ असल्याचे दिसत आहे. (Due to neglect of municipal administration street lights are on during day jalgaon news)

प्रत्यक्षात रात्रीसह दिवसाही पथदिवे चालूच ठेवण्याचा विक्रम चाळीसगाव शहरात दिसत आहे. भडगाव रोड, आडवा बाजार, धुळे रोड, हिरापूर रोड आदी परिसरात दिवसा सर्रास पथदिवे सुरू असतात.

अनेक भागातील पथदिवे मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत. बंद असलेल्या पथदिव्यांमुळे परिसरात अंधार पसरत असून, नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शहरातील विद्युल्लता कॉलनी, शास्त्रीनगर, खरजई नाका, स्मशानभूमी तसेच मालेगाव रोड परिसरात लाखो रुपये खर्चून अंधाराचे जाळे संपुष्टात आणण्यासाठी हायमास्ट दिवे बसविण्यात आले होते.

बहुतांशी पथदिवे बंदच आहेत. त्यामुळे बरेचशा चौकातील अंधाराचे सावट दूर होण्याऐवजी अडचण निर्माण झाली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Due to the neglect of the municipal administration, the street lights are on even during the day.
Jalgaon News : कवयित्री बहिणाबाईंचा पुतळा, वारकरी भवन उभारण्यास मान्यता : पालकमंत्री पाटील

शहरातील मुख्य रस्त्यावरील अनेक पथदिवे साहित्याअभावी बंद आहेत. त्यामुळे अनेक गल्लीबोळात पथदिवे बंद अवस्थेत असल्याचे दिसून येत असल्याने नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

नागरिकांची गैरसोय

नागरिक नेहमीच्या अर्थात रस्ता, गटारी आणि स्वच्छता आदी समस्यांबाबत त्रस्त असताना शहरातील मुख्य रस्त्यावर पथदिवे टाइमर नादुरुस्त असल्यामुळे दिवसा सुरू व रात्री बंद असल्याचे प्रकार दिसून येत आहे. यामुळे रात्रीच्या वेळेस नागरिकांची गैरसोय होत आहे.

"शहरातील अनेक हायमास्ट दिवे हे शोपिस ठरले आहेत. नगरपरिषद वा वीज वितरण महामंडळाच्या वतीने याची दखल घेऊन योग्य उपाययोजना लवकरात लवकर करावी." - स्वप्नील कोतकर, स्थानिक रहिवासी

Due to the neglect of the municipal administration, the street lights are on even during the day.
Amalner Bazar Samiti : बाजार समिती उभारणार केदारनाथ मंदिराची प्रतिकृती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com