Jalgaon News : मिरवणुकीत गुलाल, ‘डीजे’ला बंदी; डीवायएसपी पिंगळेच्या मार्गदर्शक सूचना

Sub-Divisional Police Officer Krishanant Pingle while guiding the Peace Committee meeting.
Sub-Divisional Police Officer Krishanant Pingle while guiding the Peace Committee meeting.esakal

Jalgaon News : आगामी काळात येणारे सण हे गुण्यागोविंदाने साजरे व्हावे, या पाश्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या आदेशावरून शहरातील प्रोफेसर कॉलनी भागातील संतोषी माता हॉलमध्ये सर्व गणेश मंडळांची बैठक नुकतीच झाली.

तर उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या दालनात ईद-ए-मिलाद हा सण उत्साहात साजरा करण्यासंदर्भात मुस्लिम समाजाचे मौलवी व इतर प्रतिष्ठित नागरिकांना बोलविण्यात आले होते. योगायोग एकाच दिवशी ईद - ए मिलाद व अनंत चतुर्दशी हे सण येत आहे. (DYSP Pingle Guidelines about anant chaturdashi and eid jalgaon news)

दोन्ही मिरवणुका समोरासमोर येऊ नये. त्याचप्रमाणे मिरवणुकीदरम्यान जातीय सलोखा कायम टिकून राहावा व ईद-ए-मिलाद व अनंत चतुर्दशी उत्साहात साजरी व्हावी, या अनुषंगाने उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांनी मार्गदर्शन करून सूचना दिल्या.

या बैठकीचे आयोजन पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक बोलाविण्यात आली होती.

या बैठकीत ईद-ए-मिलाद व अनंत चतुर्दशी हे उत्सव एकाच दिवशी येत असल्याने दोन्ही मिरवणुका समोरासमोर येऊ नयेत म्हणून मुस्लिमधर्मियांनी ईद-ए-मिलाद मिरवणुका दुपारी बारापर्यंत संपविण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sub-Divisional Police Officer Krishanant Pingle while guiding the Peace Committee meeting.
Kolhapur Ganeshotsav : गणेश मंडळांसाठी महत्वाची बातमी! आता मिरवणुकीसाठी असणार 'लकी ड्रॉ'; शिस्तीसाठी पोलिसांचा निर्णय

गणेशोत्सव काळात महिला मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी बाहेर पडतात. अशा महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथक व साध्या वेशातील पोलिस सतर्क राहतील. मिरवणूक मार्गावरील जामा मशीद परिसरात गुलाल उधळण्यास बंदी घालण्यात आली आहे.

सर्व मंडळांनीही या सूचनेस सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. या वर्षी आदर्श व प्रेरणादायी गणेशोत्सव साजरा करणारे मंडळांना 'गणराया अवॉर्ड'ने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रथम तीन व तीन उत्तेजनार्थ बक्षिसे अनंत चतुर्दशीनंतर लगेचच समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत.

Sub-Divisional Police Officer Krishanant Pingle while guiding the Peace Committee meeting.
Ganeshotsav 2023: चाकरमान्यांना मोठा दिलासा! गणेशोत्सवासाठी आता २२ डब्यांच्या रेल्वेगाड्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com