Police Headquarters News : मुख्यालयातील ‘हजेरी मास्तरां’ची सद्दी संपणार तरी कधी..!

Police Headquarters News
Police Headquarters Newsesakal

Jalgaon News : पोलिस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना हजेरी मास्तरकडून होणारा त्रास व छळाची मालिकाच यापूर्वीच ‘सकाळ’ने विस्तृत स्वरूपात मांडली आहे.

मुख्यालयातील स्टेशन डायरी सीसीटीएनएस प्रणाली सुरू करून अद्ययावत करण्याच्या प्रमुख मागणीसह इतर समस्या आणि तक्रारींचे निवेदन पोलिस अधीक्षकांसह महासंचालक आणि नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षकांना पाठविले आहे. (Economic Extortion of employees for leave duty Station diary of should be made online Jalgaon News )

जिल्ह्यातील जवळपास सर्वच पोलिस ठाणे सीसीटीएनएस प्रणालीने जोडून गुन्ह्यांसह प्रत्येक नोंद ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते.

असे असताना अद्यापही पोलिस मुख्यालयाची स्टेशन डायरी ऑनलाईन नसल्याने कर्मचाऱ्यांच्या ड्यूट्या लावताना मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहाराच्या तक्रारी वाढल्या आहेत. यासंदर्भात जिल्‍हा पोलिस अधीक्षक, नाशिक परिक्षेत्रीय पोलिस महानिरीक्षक आणि राज्याचे पोलिस महासंचालकांना निवेदन पाठविले आहे.

Police Headquarters News
Nashik News : अखेर मालेगावात पकडलेल्या 'त्या' 53 उंटांची झाली घरवापासी

काय आहे निवेदनात?

कर्मचाऱ्यांना ड्यूट्या लावण्यासाठी, ड्यूट्या करण्यासाठी व न करण्यासाठीही मुख्यालयातील हजेरी मास्तरांना पैसे मोजावे लागतात. सोईच्या ड्यूटी लावण्यासाठी, जोखमेची ड्यूटी न लावण्यासाठी आणि कुठलीच ड्यूटी न लावता महिन्याची ठराविक रक्कम संबंधित हजेरीमेजर व अधिकाऱ्यास पोस्त करावी लागते. काही कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष ड्यूटी न लावता नंतर कागदोपत्री ड्यूटी लावून समायोजित केले जाते.

गरजू पोलिसांची पिळवणूक

इमाने इतबारे पोलिस खात्यात नोकरी करीत असलेल्या गरजू कर्मचाऱ्यांना रजेवर सोडण्यासाठी पैसे घेतले जातात. पैसे नाही दिले, तर बंदोबस्त, कमी मनुष्यबळ, अशी इतर विविध कारणे पुढे करून रजा नाकारली जाते.

चिरीमीरी दिल्यानंतर लागलीच रजा मंजूर होत असल्याचे म्हटले जाते. याशिवाय ज्या भागात बंदोबस्ताची ड्यूटी असेल, त्या भागातील रहिवासी कर्मचाऱ्याला जबाबदारी न देता हेतुपुरस्सर इतर भागातील कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी ड्यूटी दिली जाते. त्यानंतर ड्यूटी रद्द करण्यासाठी पैशांची देवाणघेवाण केली जाते, असे म्हटले जाते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Police Headquarters News
Jalgaon Crime News : वाळूमाफियांचा पोलिसांवर हल्ला; पोलिसांचीच तक्रार घेण्यास ठाणे अंमलदाराची ‘ना’

मनुष्यबळाचा गैरवापर

गब्बर पोलिसांना लपण्यासाठी खास एटीएस, आर्थिक गुन्हे, अशा शांखासह गरज नसताना पोलिस स्पोर्ट अंतर्गत टेनिस ग्राउंडवर सहा आणि फुटबॉल मैदानावर चार ते सहा कर्मचारी, पोलिस वसाहतीला गस्तीला सहा कर्मचारी केवळ कागदावर नेमले जातात पाणी पिकेटसाठी आठ कर्मचारी नेमले जातात.

प्रत्यक्षात त्याठिकाणी एकच कर्मचारी असल्याचे आढळून आले आहे. लाईन पिकेट गरज नसताना १२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. प्रत्यक्षात त्याठिकाणी एक अथवा दोन कर्मचारी नेमले असल्याचे सांगण्यात आले. जिमसाठी चार कर्मचारी नेमले आहेत. त्याठिकाणी प्रत्यक्षात एक अथवा दोन कर्मचारी आहेत. मग, हे गैरहजर कर्मचारी जातात कुठे?

Police Headquarters News
Onion Rate News : कांदा भावामुळे शेतकऱ्यांत असंतोष; आंदोलनांचे भडके

गैरहजर कर्मचाऱ्यांची शाळा अशी

एका कर्मचाऱ्याची गरज असताना, चक्क १२-१२ कर्मचाऱ्यांची कागदावर ड्यूटी दाखवून त्यांना लपविण्याची कमाल, हजेरी मास्टर आणि त्याचे वरिष्ठांमार्फत केली जाते. निलंबन झालेले, पोलिस खात्यात केवळ नावाला कामावर असलेले आणि त्यांचे उद्योगधंदे वेगळेच असलेले कर्मचारी महिन्याचे पैसे हजेरी मास्तरला पुरवितात.

त्या मोबदल्यात त्यांना अशा जागी लपवले जात असल्याचे सांगितले जाते. पोलिस मुख्यालयातील तब्बल ६० टक्के कर्मचारी अशा पद्धतीने सेटींग करून त्यांच्याकडून पैसा कमविण्याचा धंदा चालविला जात असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.

Police Headquarters News
Raj Thackeray News : पदाचे जोडे काढा अन् एकदिलाने काम करा ; राज ठाकरे

बायोमेट्रीक हजेरीची मागणी

बंदोबस्त, स्ट्राँग गार्ड, कैदी पार्टी, विविध सुरक्षा कर्मचाऱ्यांचा रोजचा ड्यूटी तक्ता मुख्यालयाच्या व्हॉट्‌सॲप ग्रुपवर टाकण्यात यावा, जेणेकरून कर्मचार्यांना ड्यूट्यांची माहिती मिळले व पारदर्शकपणे कामकाज करता येईल.

सोबतच मुख्यालयाची डायरी सीसीटीएनएस संलग्नित करून त्यांच्या प्रत्येक नोंदीवर वरिष्ठांनी वेळोवेळी अवलोकन केल्यास कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर होऊन मुख्यालयातील हा भ्रष्टाचार मुळासकट नष्ट करता येईल.

Police Headquarters News
Jalgaon Monday Column : वाळूगटांचे लिलाव होऊच नये, ही माफियांसह सर्वांची इच्छा!

वाळूमाफिया पोलिस...

कर्मचारी त्यांच्या नातेवाइकांच्या नावे घेतलेल्या डंपरद्वारे वाळू व्यवसायात सहभागी असल्याचे बोलले जात आहे. अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या वाळू व्यवसायासाठी पोषक वेळ आणि वातावरण मिळण्याकामी सोयीस्कर ड्यूटी पैशांची देवाणघेवाण करून लावली जात असल्याचा आरोप केला जात आहे, असे कर्मचारी मुख्यालयाची ड्यूटी सोडण्यास तयार नसल्याचे तक्रारीत नमूद आहे.

जिल्‍हा पोलिस अधीक्षक, पोलिस महानिरीक्षक आणि राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे केलेल्या तक्रारीवर काय पावले उचलली जातात हे, यावर पोलिस दलासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

Police Headquarters News
MSRTC News : मालेगावची बस गुजरातच्या जंगलात बंद पडली!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com