Eknath Khadse News : जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांची सरकार दरबारी पत नाही : एकनाथ खडसे

Eknath Khadse Latest News
Eknath Khadse Latest Newsesakal
Updated on

Eknath Khadse News : बांधकाम विभागांतर्गत तीनशे कोटींची बिले प्रलंबित आहेत, मक्तेदार त्यासाठी उपोषण करतात. पण, जिल्ह्यात तीन मंत्री असूनही त्यांची सरकार दरबारी पत नसल्याने ते एकरकमी हा निधी आणू शकत नाही.

महाजनांनी बहिणाबाई चौधरी स्मारकासाठी १२ कोटींचा निधी जाहीर केला. हे स्मारक त्यांनी पूर्ण केले, तर आपण त्यांचे कौतुक करु. असे मत एकनाथराव खडसेंनी व्यक्त केले.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खडसेंचा निषेधाचा ठराव केल्यानंतर श्री. खडसे यांनी बुधवारी (ता. २३) पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. (eknath khadse statement about 3 ministers of jalgaon news)

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, जिल्हा बँकेच्या संचालिका ॲड. रोहिणी खडसे, सुनील माळी, रिकू चौधरी आदी या वेळी उपस्थित होते. खडसे म्हणाले, परवा झालेली डीपीडीसीची बैठक जिल्ह्यातील विकासावर चर्चेसाठी नव्हती, ती केवळ खडसेंना टार्गेट करण्यासाठी होती.

गैरव्यवहारांच्या मुद्यावरुन मी सरकारकडे तक्रारी केल्या. त्या कामांना स्थगिती मिळाली असेल, तर तीन मंत्री, दहा आमदार सत्तेत असून त्यांची पत नाही का? असा सवाल त्यांनी केला. एकीकडे आरटीओ, महावितरण, जिल्हापरिषदेतील अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल भाजपचे आमदार या बैठकीत बोलतात, रेकॉर्डिंग ऐकवतात. मग, बांधकाम विभागातील अधिकारी स्वच्छ कसे? त्यांचे समर्थन कसे केले जाते? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

मंत्र्यांनी वजन खर्ची घालावे

बांधकाम विभागाशी संबंधित कामे माझ्या तक्रारींमुळे नव्हे, तर सरकारकडे निधी नसल्याने थांबली आहेत. प्रलंबित तीनशे कोटींच्या बिलांसाठी जिल्ह्यातील तीन मंत्र्यांनी प्रयत्न करावेत. त्यांची सरकारी दरबारी पतच नाही, अशी टीका करत खडसे म्हणाले, बहिणाबाई स्मारकाचे काम आपण मंत्री असताना मंजूर केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Eknath Khadse Latest News
Eknath Khadse News : ‘पीडब्ल्यूडी’तील भ्रष्टाचार लपविण्यासाठी महाजनांचा... एकनाथ खडसेंचा आरोप

नंतर गुलाबराव देवकर पालकमंत्री झाले तेव्हा त्यांनी निधी दिला. त्यातून काही काम झाले. मात्र, त्यानंतर ते रखडले. महाजनांनी या कामासाठी १२ कोटींचा निधी देण्याचे जाहीर केले आहे. त्यांनी हा निधी देऊन काम पूर्ण करुन दाखवले, तर आपण त्याचे कौतुकही करु. याआधीही महाजनांनी जामनेरात टेक्स्टाईल पार्कचे आश्‍वासन दिले, तो अमरावतीकडे पळाला.

वरणगावचे पोलिस प्रशिक्षण केंद्र कर्जतला गेले. पशुवैद्यकीय महाविद्यालय जिल्ह्यात मंजूर होते. गुलाबराव पाटलांनी आठवडाभरात त्याची तरतूद करु, असे म्हटले. मात्र ते नगरला गेले. त्यामुळे या मंत्र्यांनी आपले वजन योजना, प्रकल्प आणण्यासाठी खर्ची घालावे, असे खडसे म्हणाले.

आपण सर्वांना भारी

सार्वजनिक बांधकाम विभागात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होतोय. त्यासंदर्भात आपण तक्रारी केल्या. तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यामुळे या कामांना स्थगिती मिळाली. शिवाय, या प्रकरणांची चौकशीही सुरु आहे. सत्ताधारी सर्व दहा आमदार, खासदार, तीन मंत्री एकीकडे आणि मी एकटा दुसरीकडे. परंतु, तरीही सरकार माझ्या तक्रारींची दखल घेऊन कामांना स्थगिती देत असेल, तर या सर्वांना आपण भारी असल्याचे त्यातून दिसते, असेही खडसे म्हणाले.

Eknath Khadse Latest News
DPDC Meeting : ‘डीपीडीसी’त गाजली अधिकाऱ्यांची लाचखोरी; आमदारांनी फोनवर एकविले डिलींग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com