
Eknath Khadse News : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस हे पुढचे मुख्यमंत्री असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे व अजित पवार यांचे काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.
अशा प्रकारच्या दाव्या-प्रतिदाव्यांमुळे निवडणुकांच्या वेळेस तिन्ही पक्षांच्या आपसांतील भानगडी समोर येतील, असा दावा राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. (eknath khadse statement about bjp shinde pawar group dispute jalgaon news)
मुक्ताईनगर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसे म्हणाले, की भाजपने राज्यातील ४८ लोकसभेच्या जागांसाठी चाचपणी सुरू केली आहे. त्यातील ४५ जागा निवडून येतील, असा दावा त्यांचा आहे. त्याचबरोबर संपूर्ण विधानसभा क्षेत्रात त्यांची चाचपणी सुरू आहे. देवेंद्र फडणवीस भावी मुख्यमंत्री असतील, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितले आहे.
जर भाजपला मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे करायचे असेल, तर आज त्यांच्यासोबत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पुढे मुख्यमंत्रिपदाची प्रतीक्षा करीत असलेल्या अजित पवारांचे काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.
एकनाथ शिंदे आताच मुख्यमंत्री आहेत; परंतु निवडणुकीत जर असे ते दावे-प्रतिदावे करीत असतील तर तिघांचे कसे जमेल? ज्यावेळी प्रत्यक्ष निवडणुकीच्या जागांचे वाटप सुरू होईल, त्यावेळी त्यांच्या आपसांतील भानगडी बाहेर येतील, असा दावाही खडसे यांनी केला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
कांदा उत्पादक संकटात
कांद्यावर केंद्र सरकारने लावलेल्या निर्यात शुल्काबाबत बोलताना खडसे म्हणाले, की ४० टक्के निर्यातशुल्क सरकारने लावल्याने फार गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. कांद्याला भाव नसल्याने शेतकरी त्रस्त आहे.
आता थोड्याफार प्रमाणात भाव मिळाला, तर त्यावर शासनाने निर्यातशुल्क लावले. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी खऱ्या अर्थाने संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला स्थिर भाव मिळावा, यासाठी सरकारने काही उपाययोजना करायला हव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
लम्पी रोगामुळे पशुधन मृत, मदत करा
जनावरांवर पडलेल्या लम्पी रोगाबाबत बोलताना खडसे म्हणाले, की पशुधनावर पडणाऱ्या लम्पी आजाराने पुन्हा राज्यभर डोके वर काढले आहे. या रोगावर अजून तरी प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नाही. सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तसेच, या रोगामुळे मृत झालेल्या पशुधनप्रश्नी शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.