SSC-HSC Exam 2024 : बारावीचे 48 हजार तर दहावीचे 57 हजार परिक्षार्थी; 21 फेब्रुवारीपासून परिक्षा

उच्च माध्यमिक शालांत परिक्षा (बारावी) येत्या २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
Nashik Divisional Board President Bhausaheb Chavan guiding the Bharari team meeting
Nashik Divisional Board President Bhausaheb Chavan guiding the Bharari team meetingesakal

SSC-HSC Exam 2024 : उच्च माध्यमिक शालांत परिक्षा (बारावी) येत्या २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. प्रात्येक्षिक परिक्षा २ फेब्रुवारीपासून सुरू होतील. त्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. यंदा बारावीसाठी ४८ हजार २७३ परीक्षार्थी आहेत.

तर दहावीसाठी ५७ हजार ११० परीक्षार्थी आहेत. (Examination of ssc and hsc from 21st February 2024 jalgaon news)

दोन्ही परीक्षांसाठी आठ भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. कॉपी मुक्त परिक्षा होण्यासाठी ही पथके नेमण्यात आली. परिक्षेच्या सर्व माहितीबाबत आज नाशिक येथे बोर्डाच्या कार्यालयात शिक्षण विभागाच्या भरारी पथकाची बैठक झाली.

बारावीच्या परिक्षेसाठी २७ हजार ७६८ मुले तर २० हजार ५०५ मुली असे एकूण ४८ हजार २७३ परीक्षार्थी आहेत. या परिक्षेसाठी ७८ परिक्षा केंद्र आहेत.

शाखा निहाय विद्यार्थी असे -

विज्ञान शाखा--२५ हजार ३१२

कला--१६ हजार २४४

वाणिज्य--५ हजार १६१

व्यावसायीक- १ हजार ५२३

आयटीआय--३२

एकूण--४८ हजार २७३

Nashik Divisional Board President Bhausaheb Chavan guiding the Bharari team meeting
SSC-HSC Exam 2024 : दहावी-बारावीचे 2 फेब्रुवारीपासून प्रात्यक्षिक परिक्षा

दहावीचे परीक्षार्थी असे

मुले--३२ हजार ३७८

मुली--२४ हजार ७३२

एकूण--५७ हजार ११०

या परिक्षेसाठी १४३ परिक्षा केंद्रे आहेत. ७९९ शाळा यासाठी आरक्षीत आहेत.

आठ भरारी पथके अशी..

प्राथमिक विभाग, माध्यमिक विभाग, महिला अधिकारी, आदी विभागाची पथके तयार करण्यात आली आहेत. एका पथकात सात ते आठ अधिकारी आहेत.

Nashik Divisional Board President Bhausaheb Chavan guiding the Bharari team meeting
SSC-HSC Exam 2024 : दहावी, बारावीच्‍या परीक्षेला मिळणार अतिरिक्‍त 10 मिनिटे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com