Jalgaon Crime News : उपजिल्हाधिकारी हल्ला प्रकरणात अटकेतील दोघांच्या कोठडीत वाढ

जळगाव -नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नशिराबादच्या अलीकडेच तरसोद गावाजवळ निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर वाळूमाफियांनी प्राणघातक हल्ला केला होता.
crime
crimeesakal

Jalgaon Crime News : जळगाव -नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नशिराबादच्या अलीकडेच तरसोद गावाजवळ निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर वाळूमाफियांनी प्राणघातक हल्ला केला होता.

नशिराबाद पोलिस ठाण्यात दाखल या गुन्ह्यातील १६ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर पहिल्या दिवशी अटकेतील दोन संशयितांची बुधवार (ता.१४) पर्यंत पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. (Extension of custody of two arrested in sub collector attack case jalgaon crime news)

crime
Nashik Cyber Crime: सोशल मीडियावर महापुरुषांविषयी आक्षेपार्ह Tweet! नाशिक पोलिसांकडून संशयिताला मुंबईतून अटक

निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार आणि तहसीलदार बनसोडे असे दोघं तरसोद फाट्याजवळ मंगळवार (ता.६) रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास वाळूचे डंपरवर कारवाई करण्यासाठी गेले असताना अचानक त्यांच्यावर वाळूमाफियांनी प्राणघातक हल्ला चढवला होता.

यात निवासी उपजिल्हाधिकारी कासार यांच्या डोक्यावर लोखंडी रॉड टाकल्याने ते जखमी झाले होते. त्यानंतर मारेकरी फरार झाले होते.

यातील गौतम यशवंत पानपाटील (वय ३८, रा. सावखेडा) आणि विठ्ठल भगवान पाटील (३६, रा. ज्ञानदेव नगर) यांच्यासह इतरांना अटक करण्यात आली असून संशयित गौतम पानपाटील आणि विठ्ठल पाटील यांची सोमवारी (ता.१२) पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्या. श्रीमती एम. एम. बडे यांनी दोघांना १४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

crime
Jalgaon News : 8 दिवसांत निघाले दिशादर्शकावरील ‘रेडियम’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com