Jalgaon : सोशल मीडियात बदनामीसह खंडणी

social media defamation & extrotion jalgaon news
social media defamation & extrotion jalgaon newsesakal

जळगाव : भुसावळ शहरातील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीकडून दहा हजारांची खंडणी (Extortion) मागून ती न दिल्याचा राग आल्याने मोबाईलमधील डाटा चोरुन त्याच्या नावाने महिलांच्या नंबरवर अश्‍लील मेसेज पाठवले.

आता मजकुराच्या आधारे बदनामीची धमकी मिळत असल्याची तक्रार पीडित व्यक्तीने केली आहे. (Extortion with defamation on social media jalgaonLatest Crime News)

social media defamation & extrotion jalgaon news
डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयाचे पुन्हा कोविड सेंटरमध्ये रूपांतर

भुसावळ शहरात ४० वर्षीय प्रौढ व्यक्ती आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. गुरुवारी (ता. २१) रात्री ११ वाजेच्या सुमारास त्यांच्या व्हॉटसॲप क्रमांकावर अनोळखी व्यक्तीकडून मॅसेज आला. त्यात १० हजारांची खंडणीची मागणी केली.

संबंधित व्यक्तीने पैशांची पूर्तता न केल्याने समोरील अनोळखी व्यक्तीने प्रौढाच्या मोबाईलचा डाटा चोरून त्यात महिलांचे मोबाईल क्रमांकासोबत अश्लील भाषा वापरली आणि सोशल मीडियात व्हायरल करून दिले.

त्यामुळे त्यांची बदनामी करून १० हजारांची मागणी करत आहे. संबंधित व्यक्तीने जळगाव सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल नोंदवण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले करीत आहे.

social media defamation & extrotion jalgaon news
महानगरपालिकेच्या आयुक्तपदी डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार यांची नियुक्ती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com