Jalgaon Anant Chaturdashi : महापालिकेतर्फे मेहरूण तलावावर श्री गणेश विसर्जनासाठी सुविधा; पट्टीचे पोहणारे तैनात

Jalgaon Anant Chaturdashi : महापालिकेतर्फे मेहरूण तलावावर श्री गणेश विसर्जनासाठी सुविधा; पट्टीचे पोहणारे तैनात
esakal

Jalgaon Anant Chaturdashi : महापालिकेतर्फे मेहरूण तलावावर गुरूवारी (ता. २८) श्री गणेश विसर्जनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या ठिकाणी मूर्ती पाण्यात विसर्जनासाठी दोन तराफे, नऊ बोटी व पट्टीचे पोहणारेही तैनात करण्यात आले आहेत.

सतरा मजली इमारतीपासून थेट मेहरूण तलावापर्यंत विसर्जन मार्गावरही खड्डे बुजविण्यासह प्रखर उजेडाचे विद्युत दिवे लावण्यात आले आहेत.

महापालिकेतर्फे विसर्जन मार्गावर अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या असून, विद्युत तारांचा अडथळाही दूर करण्यात आला आहे. तसेच विसर्जन मार्गावरील जोड रस्ते बॅरेकेटस लावून बंद करण्यात आले आहेत. (Facilities for Shri Ganesha immersion at Mehrun Lake by Municipal Corporation jalgaon news)

मेहरूण तलाव येथे विद्युत प्रखर व्यवस्था करण्यात आली आहे. तलाव येथे ९ तराफे, दोन बोटी, पट्टीचे पोहणारे कर्मचारी व मनपा कर्मचारी, स्वयंसेवी सामाजिक संस्था व पोलीस प्रशासनाच्या मदतीने संपूर्ण विसर्जन व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे.

लहान मूर्तीसाठी गणेश घाट

घरगुती गणपती व छोट्या गणेश मूर्ती मेहरूण तलावावरील गणेश घाट येथे विसर्जित करण्यात येणार आहेत. लहान गणेश मूर्ती असलेल्यांनी गणेश घाट येथे जावे, असे अवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

मोठ्या मूर्तीसाठी सेंट टेरेसाजवळ व्यवस्था

गणेश मंडळाच्या मोठ्या मूर्त्यांसाठी महापालिकेतर्फे स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मेहरूण तलावाजवळ असलेल्या सेंट टेरेसा इंग्लीश मिडीयम शाळेच्या मागील बाजूस ही व्यवस्था करण्यात आली आहे. मोठ्या मंडळांनी त्या ठिकाणी मूर्ती आणाव्यात असे अवाहन करण्यात आले आहे.

Jalgaon Anant Chaturdashi : महापालिकेतर्फे मेहरूण तलावावर श्री गणेश विसर्जनासाठी सुविधा; पट्टीचे पोहणारे तैनात
Ganeshotsav 2023: खलिस्तानमुळे बदनाम झालेल्या कॅनडामध्ये असा साजरा झाला गणेशोत्सव

नागरिकांनी पाण्यात जावू नये

मेहरूण तलावावर महापालिकेतर्फे संपूर्ण सुविधा करण्यात आली आहे. त्या ठिकाणी कर्मचारीही नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी पाण्यात जावून श्री गणेश मूर्ती विसर्जनाचा आग्रह करू नये, असे अवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

महापालिकेतर्फे मंडळांचा सत्कार

महापालिकेतर्फे विसर्जन मिरवणूकीत सहभागी होणाऱ्या मंडळांचा सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात येणार आहे. त्यासाठी सतरा मजली इमारतीजवळ व्यासपीठ उभारण्यात आले आहे. या वेळी महापालिकेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

गिरणा नदीवर बंदी

गिरणा नदीवर निमखेडी येथे गणेश विसर्जन करण्यास प्रशासनातर्फे बंदी घालण्यात आली असल्याचे प्रशासनाने यापूर्वीही जाहीर आवाहनाद्वारे कळविलेले आहे. अनंत चतुर्दशीच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी महापालिकेने पुन्हा आवाहन केले आहे. त्या ठिकाणी कोणीही श्री गणेश मूर्ती विसर्जन करण्यास जावू नये.

श्री गणेश विसर्जन आनंदात व शांततेत संपन्न करण्यासाठी नागरिकांनी, गणेश मंडळांनी, सामाजिक संस्थांनी जळगाव महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी केले आहे.

Jalgaon Anant Chaturdashi : महापालिकेतर्फे मेहरूण तलावावर श्री गणेश विसर्जनासाठी सुविधा; पट्टीचे पोहणारे तैनात
Nashik Anant Chaturdashi : गणेश विसर्जनासाठी 27 नैसर्गिक, 56 कृत्रिम तळे; सोसायटीसाठी ‘टँक ऑन व्हील’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com