Nashik Anant Chaturdashi : गणेश विसर्जनासाठी 27 नैसर्गिक, 56 कृत्रिम तळे; सोसायटीसाठी ‘टँक ऑन व्हील’

Nashik Anant Chaturdashi : गणेश विसर्जनासाठी 27 नैसर्गिक, 56 कृत्रिम तळे; सोसायटीसाठी ‘टँक ऑन व्हील’
esakal

Nashik Anant Chaturdashi : पर्यावरण पुरक गणेशोत्सवासाठी महापालिकेने विसर्जनासाठी २७ नैसर्गिक तर ५६ कृत्रिम तळांची निर्मिती केली आहे. विसर्जन करताना पीओपी मुर्ती नदीपात्रात विसर्जित न करता दान करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सोसायटीसाठी ‘ टॅंक ऑन व्हील’ हा उपक्रम देखील राबविला जाणार आहे.

महापालिकेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे 'मिशन विघ्नहर्ता' संकल्पना राबविली जाते. या मोहिमेअंतर्गत विसर्जनासाठी पारंपरिक २७ ठिकाणांबरोबरच जलप्रदूषण टाळण्यासाठी ५६ कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. (Municipal Corporation created 27 natural and 56 artificial ponds for immersion anant chaturdashi nashik news)

विभागनिहाय नैसर्गिक विसर्जन स्थळे

- पूर्व : लक्ष्मीनारायण घाट, रामदास स्वामी मठ, मनपा एसटीपी परिसर-आगर टाकळी, नंदिनी गोदावरी संगम.

- सातपूर : गंगापूर धबधबा, सोमेश्वर, चांदशीपूल, मते नर्सरी पूल.

- नाशिकरोड : चेहडीगाव नदी किनारा, पंचक गोदावरी नदी स्वामी जनार्दन पुलालगत, दसक गाव नदीतीरी, वालदेवी नदीकाठ, देवळाली गाव, विहीतगाव,

- पंचवटी : राजमाता मंगल कार्यालय, म्हसरूळ सीता सरोवर, नांदूर-मानूर, आडगाव पाझरतलाव, तपोवन, रामकुंड परीसर, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, टाळकुटेश्वर सांडवा.

- पश्चिम : यशवंत महाराज पटांगण, रोकडोबा पटांगण, कपूरथळा पटांगण, सिद्धेश्वर मंदीर, घारपुरेघाट, हनुमान घाट.

- नवीन नाशिक : पिंपळगाव खांब, वालदेवी घाट.

Nashik Anant Chaturdashi : गणेश विसर्जनासाठी 27 नैसर्गिक, 56 कृत्रिम तळे; सोसायटीसाठी ‘टँक ऑन व्हील’
Nashik Anant Chaturdashi : गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे वाहतूक मार्गात बदल; हे आहेत पर्यायी मार्ग

विभागनिहाय कृत्रिम तलाव

- पूर्व : लक्ष्मीनारायण घाट, रामदास स्वामी मठाजवळ, रामदास स्वामी नगर लेन-१ बस स्टॉप जवळ, नंदिनी गोदावरी संगम, साईनाथ नगर चौफुली, डीजीपी नगर गणपती मंदिर जवळ, शारदा शाळेसमोर, राणेनगर, कलानगर चौक, राजसारथी सोसायटी.

- सातपूर : शिवाजी नगर सुर्यामर्फी चौक, अशोक नगर पोलीस चौक, नंदिनी नदी, नासर्डीपूल, अंबड-लिंकरोड, नंदीनी नदी, आयटीआय पूल, सातपूर, पाईपलाईनरोड, जॉगिंग ट्रॅक समोर.

- नाशिकरोड : महापालिका शाळा क्र.१२५ मुक्तीधाम, शिखरेवाडी मैदान, मनपा नर्सरी जयभवानी रोड, महापालिका क्रीडांगण, चेहडी पंपिंग श्रमिक नगर पुणे रोड, नारायण बापू नगर चौक जेलरोड, राजराजेश्वरी चौक, गाडेकर मळा देवळालीगाव, के.एन.केला विद्यालय.

- पंचवटी : राजमाता मंगल कार्यालय, गोरक्षनगर, आरटीओ कॉर्नर, नांदूर-मानूर, कोणार्क नगर, तपोवन, प्रमोद महाजन गार्डन, सरस्वती नगर, रामवाडी जॉगिंग ट्रॅक शेजारी.

- पश्चिम : चोपडा लॉन्स पुल मागे गोदापार्क, चव्हाण कॉलनी, परीचीबाग, पंपीगस्टेशन जवळ, फारेस्ट नर्सरीपूल जवळ, गंगापूररोड, बॅडमिंटन हॉल, येवलेकर मळा, दोंदे पूल उंटवाडी म्हसोबा मंदिर जवळ नासर्डी पूल (नंदिनी नंदी), महात्मा नगर पाण्याच्या टाकीजवळ, पालिका बाजार, लायन्स क्लब मैदान, पंडित कॉलनी महापालिका कार्यालयासमोर, शीतळा देवी मंदीरासमोर टाळकुटेश्वर मंदीर.

सिडको : गोविंद नगर जिजाऊ वाचनालय, राजे छत्रपती व्यायामशाळा जवळ, जुने सिडको, पवन नगर, जुलकुंभ हिरे शाळे जवळ सिडको, राजे संभाजी स्टेडियम, सिंहस्थ नगर, मीनाताई ठाकरे शाळा, कामटवाडे, डे-केअर शाळा रामनगर, राजीवनगर.

Nashik Anant Chaturdashi : गणेश विसर्जनासाठी 27 नैसर्गिक, 56 कृत्रिम तळे; सोसायटीसाठी ‘टँक ऑन व्हील’
Anant Chaturdashi Eid : विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्ही, ड्रोन ठेवणार ‘वॉच’; ईद-ए-मिलाद जुलूस मार्गावरही 50 कॅमेरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com