Cyber Crime : तोतया सेनाधिकाऱ्याने डॉक्टरला गंडविले सव्वा लाखांत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Cyber Crime : तोतया सेनाधिकाऱ्याने डॉक्टरला गंडविले सव्वा लाखांत

जळगाव : शहरतील बसस्थानकमागील रहिवासी तथा होमियोपॅथी डॉक्टरांच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीने मी सेनाधिकारी असल्याची बतावणी केली. (fake army officer cheated doctor for quarter million Jalgaon crime news)

आमच्या केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्याचा बहाणा करुन फी म्हणून पैसे देण्याचे सांगत क्रेडीट कार्डच्या युपीआय पीनद्वारे १ लाख २४ हजार ९९७ रुपयांत ऑनलाईन पद्धतीने गंडविल्याप्रकरणी जिल्‍हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

पद्मालय भोजनालयाजवळच होमियेापॅथी तज्ज्ञ प्रमोद वसंत जोशी यांना रविवारी (ता. २२) रात्री आठच्या सुमारास सतीश कुमार याने भ्रमणध्वनीवरून मी सेना अधिशकारी असून, केंद्रीय विद्यालयात कार्यरत आहे.

आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांची तपासणी करायची आहे. प्रत्येक विद्यार्थी १५० रुपयांप्रमाणे आपल्याला फी पाठवत आहे. तुमच्या क्रेडीट कार्डवर पैसे येणार असून, तुम्ही पेटीएम ॲपवर जाऊन पिन रिसेट करण्यास सांगितले.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

हेही वाचा: Jalgaon Crime News: जामिनावर सुटताच गुन्हेगाराचा पुन्हा उपद्रव; घातक शस्त्रास्त्राचे 7 गुन्हे

संशयित सतीश कुमार याने सांगितल्याप्रमाणे डॉ. प्रमोद जोशी यांनी ऑनलाईन माहिती भरल्यावर त्यांच्या खात्यातून एक लाख २४ हजार रुपये संबंधिताच्या महिंद्रा कोटक बँकेच्या खात्यात वर्ग झाले.

घडल्या प्रकरात आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यावर प्रमोद जोशी यांनी सायबर पोलिसांना माहिती दिली. मात्र, त्यांना गुन्हा दाखल करण्यासाठी जिल्‍हापेठ पोलिसांत पाठविण्यात आले.

फी न घेण्याचे सांगूनही बळजबरी

तुम्ही देशाची सेवा करताय. आम्हाला तुमच्याकडून फी नकोय, असे डॉ. प्रमोद जोशी यांनी वारंवार सांगितल्यावर सतीश कुमार याने सेनेच्या शिस्तीचा दाखला देत प्रत्येक विद्यार्थ्याच्या तपासणीसाठी १५० रुपये देत असल्याचे सांगत खात्यात झाडू मारल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

हेही वाचा: Sai Gopal Maharaj |आपले आयुष्य नीतिमत्तेने जगले पाहिजे : साई गोपाल महाराज