Latest Marathi News | सरत्या वर्षाला निरोप अन् नववर्षाचे स्वागतही जल्लोषात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

New Year Celebration

Jalgaon News : सरत्या वर्षाला निरोप अन् नववर्षाचे स्वागतही जल्लोषात

जळगाव : कोरोनामुळे दोन वर्षांनंतर कोणत्याही निर्बंधांशिवाय यंदाचा थर्टीफर्स्ट (३१ डिसेंबर) आज साजरा झाला. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागतही जल्लोषात झाले.

सर्वांनी इंग्रजी नववर्षाच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या. फोनसह व्हॉट्सअॅप, फेसबूक, ट्विटीद्वारे नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. मद्यपान करणाऱ्यांनी रात्री एकपर्यंत ओली पार्टी केली. अनेक हॉटेल्समध्ये संगीत रजनीचे कार्यक्रम झाले. (Farewell to new year and welcome the new year with joy Jalgaon News)

हेही वाचा: Crime News : मोबाईलवर फिल्म दाखवण्याच्या बहाण्यानं सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार; आधी टेरेसवर नेलं अन् तिथं..

हॉटेल्सवर रोषणाई करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न झाला. अनेक शाकाहारी हॉटेल्समध्ये अनेक कुटुंबीय ३१ डिसेंबरची सायंकाळ घालविताना दिसले.शहरातील सतरा मजली इमारतीशेजारी असलेल्या पाणीपुरी, पावभाजी, आइस्क्रीमसह विविध खाद्यापदार्थ्यांच्या गाड्यांवर सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत ग्राहकांची गर्दी होती.

गेल्या वर्षी ३१ डिसेंबरला मार्गशीर्ष गुरुवार आणि रात्री दहापर्यंतच हॉटेल खुली राहिल्याने मनसोक्त सेलिब्रेशन करता आले नव्हते. या पार्श्‍वभूमीवर यंदा सलग दोन दिवस जल्लोषाचेच होते. कारण १ जानेवारीलाच यंदा रविवार आला आहे. त्यामुळे शहर आणि परिसरातील हॉटेल्स, रिसॉर्टस, फार्म हाउस हाउसफुल होती.

विविध हॉटेल्सचा विचार करता आता येथे अनेक रेसिपीज उपलब्ध आहेत. खास नववर्षानिमित्त येथे विविध पॅकेजेसही उपलब्ध आहेत. त्यालाही ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. पंजाबी-चायनीजसह क्रीम चिकन सूप, चिकन मसाला, मटण मसाला, सुके मटण, चिकन मुर्ग मसाला, चिकन टिक्का, चिकन सॅंडवीच आदी रुचकर पदार्थ आता बहुतांश हॉटेलांमध्ये ग्राहकांना चाखायला मिळाले.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

हेही वाचा: New Year 2023 : पोलिसांची करडी नजर, तरीही नविन वर्षाचा जल्लोष...

शाकाहारी व मांसाहारी बिर्याणीच्याही असंख्य रेसिपीज खास सेलिब्रेशनसाठी सज्ज होत्या. तंदूर कबाब, तवा कबाब, शाही कबाब अशा विविध कबाब यांही मोठी मागणी होती.

‘फिश लव्हर्स’साठीही अनेक रेसिपीज उपलब्ध असून, माशांवरही तितक्याच मोठ्या संख्येने ताव मारला गेला. हॉटेल्समध्ये बोनलेस स्पेशल क्रिस्पी चिकन पॉपकॉर्न, क्रिस्पी चिकन लॉलीपॉप फ्राय, स्पायसी ॲन्ड हॉट चिकन ड्रमस्टिक फ्राय, चिकन मसाला फिंगर्स अशा विविध रेसिपीजवर ताव मारल्याचे पहावयास मिळाले.

खबरदारी घेऊनच सेलिब्रेशन

दोन वर्षांनी कोणत्याही निर्बंधांशिवाय सेलिब्रेशन झाले असल्याने पोलिसांनी कालपासूनच वाहनांची तपासणी सुरू केली होती. दुचाकी, चारचाकी वाहनधारक रात्री वाहन चालविताना मद्दपान करून चालवीत नाही ना? त्यांच्याकडे लायसन्स आहे किंवा नाही, याची विचारपूस पोलिस करताना दिसत होते. शहर परिसरात भरारी पथके नेमल्याचे दिसून आले.

हेही वाचा: Jalgaon News : अबब ! जात प्रमाणित करण्यासाठी 10 लाखांची लाच