Latest Marathi News | शेतकऱ्यांचा जळगावमध्ये मोर्चा; जिल्हाधिकाऱ्याना मांडली नुकसानीची व्यथा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon: Farmers gathered to give a statement to Collector Aman Mittal at the Collectorate

Jalgaon News : शेतकऱ्यांचा जळगावमध्ये मोर्चा; जिल्हाधिकाऱ्याना मांडली नुकसानीची व्यथा

जळगाव : चिनावल, वडगाव, वाघोदा व रावेर परिसरात तीन शेतकऱ्यांचे चार हजार केळी खोड कापून सुमारे १० लाखांचे नुकसान करण्यात आले होते. या अपप्रवृत्तीच्या लोकांचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी या परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून नुकसानीची माहिती दिली.

भारतीय किसान संघातर्फे जिल्हाधिकारी अमन मित्तल, पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना निवेदन देण्यात आले. (Farmers march in Jalgaon Farmer presented pain of loss to district collector Jalgaon News)

हेही वाचा: Jalgaon News : भिलवाडात महंत सरजूदास महाराज अटकेत

खासदार रक्षा खडसे, भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव महाजन, तालुकाध्यक्ष राहुल महाजन, सचिव भास्कर सरोदे, ललित चौधरी, माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, बाजार समितीचे माजी सभापती गोपाळ नेमाडे, नुकसानग्रस्त शेतकरी पंकज नारखेडे, दगडू पाटील, डॉ. मनोहर पाटील, माजी सरपंच योगेश बोरोले, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष सागर भारंबे, डॉ. डिगंबर महाजन, उपसरपंच परेश महाजन, सचिन चौधरी, विजय चौधरी, सचिन पाटील, प्रशांत तायडे, पंकज झोपे, दिग्विजय चौधरी, भरत बोंडे, राहुल पाटील, हरीश धाडे, सचिन बऱ्हाटे, प्रकाश भंगाळे, गंगाराम राणे, दिनेश महाजन, अमोल महाजन, गुणवंत नेमाडे, संदीप टोके, जितेंद्र वानखेडे, युवराज महाजन, ललीत झांबरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

हेही वाचा: Jalgaon News : 12 बाजार समित्यांच्या निवडणूकीचा मार्ग मोकळा

शेतकरी पंकज नारखेडे, दगडू पाटील यांनी जिल्हाधिकारी अमन मितल यांना निवेदन देऊन आपली आपबिती कथन केली आणि आम्हा शेतकऱ्यांना न्याय व सुरक्षा द्या, अशी मागणी केली. आरोपी लवकरच निष्पन्न होतील, वेळ आल्यास आरोपींवर एमपीडीए (मोक्का) लावण्यास विचार करण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असे आश्वासन श्री. मित्तल यांनी दिले.

केळीवर तणनाशक टाकले

सलग दुसऱ्या दिवशी चार बिघे केळी पिकांवर अज्ञातांनी तणनाशक टाकून केळीचे खोडे खराब केली. यातही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.

हेही वाचा: Crime News : खोट्या अनुभवपत्रामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात

टॅग्स :JalgaonFarmerCollector