Jalgaon News: मुक्ताईनगर, बोदवड, रावेरच्या शेतकरी, युवकांना कर्ज मिळणार; चंद्रकांत पाटील यांची माहिती

Loan
LoanSakal

Jalgaon News: मुक्ताईनगर, रावेर, बोदवड तालुक्यातील शेतकरी, स्वयंरोजगारासाठी इच्छुक, युवकांना कर्ज प्रकरणे मंजूर होऊनही कर्ज मिळत नव्हते. अनेक अडचणी युवकांना, शेतकऱ्यांना कर्ज प्रकरणात येत होत्या.

यामुळे आज जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँक अधिकाऱ्यांची बैठक बोलावून अडचणी सोडविण्यावर चर्चा झाली. यामुळे बँका आता या तिन्ही तालुक्यातील शेतकरी, युवकांना कर्ज देईल, अशी आशा निर्माण झाली आहे, अशी माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकारांना दिली. (Farmers youth of Muktainagar Bodwad Raver will get loans jalgaon news)

जिल्हाधिकारी कार्यालयात बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्यानंतर ते बोलत होते. केंद्र व राज्य शासनाचे अनेक योजना आहेत. ज्यातून युवक, शेतकऱ्यांना कर्ज मिळते. त्यातून ते स्वयंरोजगार करू शकतात. शेतीसाठी कर्ज काढून उत्पादन वाढवू शकतात. अनेकांची प्रकरणे मंजूर आहे.

मात्र बँकाकडून कर्ज मिळत नसल्याच्या तक्रारी मुक्ताईनगर, बोदवड, रावेर तालुक्यातील शेतकरी, युवकांच्या होत्या. त्या संबंधितांना घेऊन आज बैठक घेतली. बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या. संबंधितांच्या त्या लक्षात आल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना कडक शब्दात समज दिली. यामुळे आता संबंधितांना कर्ज मिळणार अशी आशा निर्माण झाली आहे.

Loan
Jalgaon News: वार्षिक योजनेत अनु. जाती उपयोजना निधी खर्चात जळगाव राज्यात प्रथम

खडसेंसाठी ’मुक्ताईचरणी’ प्रार्थना

माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे हे आजारी आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले, की खडसे लवकर बरे व्हावेत, अशी मी मुक्ताईनगरचरणी प्रार्थना करतो. ते लवकर बरे होवून समाजकारणात येवो. समाजाचे अधिक कार्य त्यांच्याकडून होवो, ही अपेक्षा करतो.

शासकीय योजनांचा फायदा

ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात शिंदे गटांचे वर्चस्व असल्याबाबत आमदार पाटील म्हणाले, की राज्यातील शिंदे सरकार चांगले काम करीत आहे. राज्य, केंद्र शासनाच्या योजना ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोचल्या आहेत. यामुळे मतदारांनी शिंदे-भाजपच्या उमेदवारांना कौल दिला आहे.

Loan
Jalgaon News: व्यापारी संकुलांच्या गाळे भाडेपट्ट्याचा तिढा सुटला; आमदार भोळे यांच्या प्रयत्नांना यश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com