Jalgaon News : महामार्गाचे सदोष इंजिनिअरिंग, जागोजागी साचले तलाव; वाहनधारकांचा जीव टांगणीला

Accumulated water near bus stop constructed on service road near Dadawadi.
Accumulated water near bus stop constructed on service road near Dadawadi. esakal

Jalgaon News : शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या सदोष चौपदरी मार्गनिर्मितीचे दुष्परिणाम जळगावकरांना कायमस्वरूपी भोगावे लागत आहेत. दोन वर्षांपूर्वी कसेबसे काम उरकलेल्या चौपदरीकरणात अनेक त्रुटी राहिल्यामुळे पावसाळ्यात हे निकृष्ट काम चव्हाट्यावर येते.

सध्या तुरळक पाऊस पडत असला, तरी त्यामुळेही महामार्गाच्या विविध चौकांमध्ये व सर्व्हिस मार्गावर पाण्याचे तलाव साचत असून, वाहनधारकांचा जीव टांगणीला लागत आहे. (Faulty engineering of the highway caused ponding in places jalgaon news)

जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या दुतर्फा शहराचा विस्तार वाढून वाहनधारकांची संख्याही कमालीची वाढली आहे. अगदी बांभोरी पुलापासून थेट तरसोद फाट्यापर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी नागरी वस्ती, तसेच व्यावसायिक परिसरही वाढला आहे. त्यामुळे स्वाभाविकच वाहनधारकांची संख्या वाढून हा महामार्ग धोकादायक बनला आहे.

अनेक वर्षांची मागणी पूर्ण

अनेक वर्षांपासून या महामार्गालगत सर्व्हिस रस्ते करावे, यांसह तो चौपदरीकरणाचीही मागणी होऊ लागली होती. तत्कालीन महामार्ग क्रमांक सहा चौपदरी होत असताना तो जळगाव शहराला वळसा घालून (बायपास) गेला.

त्यामुळे जळगाव शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी विशेष मंजुरी घेण्यात आली. २०१९ मध्ये या रस्त्याचे काम सुरू झाले आणि खोटेनगर ते कालिंकामाता चौकापर्यंतच्या सात किलोमीटर टप्प्याचे काम करण्याचे निश्‍चित होऊन जळगावकरांची मागणी पूर्ण झाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Accumulated water near bus stop constructed on service road near Dadawadi.
Jalgaon News : 6 महिन्यात 44 तरुणी प्रियकरासोबत सैराट; पाचोरा तालुक्यातील स्थिती
दादावाडीजवळील सर्व्हिस रस्त्यावर साचलेले पाणी.
दादावाडीजवळील सर्व्हिस रस्त्यावर साचलेले पाणी.esakal

सदोष निर्मितीमुळे समस्या

महामार्गाचे चौपदरीकरण तर मंजूर झाले, मात्र त्यासाठी अवघ्या ६९ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली. तेवढ्या निधीत या रस्त्याचे काम कसेबसे उरकण्यात आले. काम सुरू झाल्यापासूनच त्यात प्रचंड दोष व त्रुटी होत्या.

काम सुरू होऊन पहिल्या टप्प्यात असतानाच शहरातील काही तज्ज्ञांनी व सुज्ञ नागरिकांनी या त्रुटी, दोष प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतरही त्यावर समाधान न शोधल्याने कसाबसा हा मार्ग पूर्ण करण्यात आला आणि त्याचे परिणाम आता जळगावकरांना कायमचे भोगावे लागणार आहेत.

ठिकठिकाणी साचताय तलाव

महामार्गाचे चौपदरीकरण करताना दादावाडी, अग्रवाल हॉस्पिटल चौक, प्रभात कॉलनी चौकात अंडरपास (भुयारी मार्ग) तयार केला आहे. त्या प्रत्येक भुयारी मार्गाची रचना योग्य नसल्याने तीनही ठिकाणी एका बाजूला पाणी साचते.

Accumulated water near bus stop constructed on service road near Dadawadi.
Jalgaon Crime News : खेडी, बांभोरी, सावखेड्यात अवैध वाळूसाठ्यावर छापे; 250 ब्रास साठा जप्त
अग्रवाल हॉस्पिटलजवळील सर्व्हिस रस्त्यावर साचलेले पाणी.
अग्रवाल हॉस्पिटलजवळील सर्व्हिस रस्त्यावर साचलेले पाणी.esakal

शिवाय या प्रत्येक उड्डाणपुलालगत सर्व्हिस रस्ते देण्यात आले आहेत. त्या सर्व्हिस रस्त्यांवर थोडा पाऊस झाला, तरी पाण्याचा तलाव साचतो. त्यामुळे वाहनधारकांचा जीव टांगणीला लागतो.

शाळांच्या परिसराने वाढतो धोका

त्यातही या महामार्गावर अग्रवाल शिवकॉलनी ते अग्रवाल हॉस्पिटल व पुढे प्रभात चौकापर्यंतच्या परिसरात शाळा-महाविद्यालयांची संख्या मोठी आहे. त्यामळे विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचे प्रमाण प्रचंड असते. परिसरातून जाताना प्रचंड धोका वाढतो. जळगावात पावसाचे प्रमाण दर वर्षी मर्यादितच असते.

मात्र, या थोड्याफार पावसातही महामार्गाची वाट लागते. पाणी साचण्यासह महामार्गावर अनेक ठिकाणी पावसामुळे खड्डेही पडले आहेत. वर्ष, दोन वर्षांतच महामार्गाची वाट लागल्यामुळे नागरिकांचा प्रचंड संताप होतोय. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह मक्तेदाराबद्दल नागरिक तीव्र भावना व्यक्त करीत असून, महामार्गातील दोष दूर करून त्याचे अपग्रेडेशन करावे, अशी मागणी होत आहे.

Accumulated water near bus stop constructed on service road near Dadawadi.
Digital India Week : डिजिटल इंडिया सप्ताह 25 जुलैपासून; या संकेतस्थळावर करा नोंदणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com