Latest Marathi News | जळगाव : तांबापुरात 2 गटांत घामासान; दोन तरुण जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime Latest Marathi News

जळगाव : तांबापुरात 2 गटांत घामासान; दोन तरुण जखमी

जळगाव : शहरातील तांबापुरा मच्छी मार्केट परिसरात मंगळवारी (ता. २) रात्री दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाल्यानंतरही दोन्ही गटांत घमासान सुरू होती. यात दोन तरुण जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्‍हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Latest Marathi News)

हेही वाचा: मोदींमुळेच देश जागृत होतोय; राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची स्तुतीसुमनं

तांबापुरा भागात मंगळवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास किरकोळ कारणावरून वादाला सुरवात झाली. वादाचे पर्यावसन हाणामारीत होऊन लाठ्या काठ्यांसह, बॉटल- दगडफेक करून घामासान हाणामारी झाली. घटनेची माहिती कळताच उपनिरीक्षक अनीस शेख, इम्रान बेग, मंदार पाटील यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. मच्छी बाजारात दोन्ही गटांत हाणामारी सुरूच होती. पोलिसांनी परिस्थिती हाताळण्यासाठी काठ्यांचा वापर केल्यावर जमाव पांगला.

हेही वाचा: Jaggery Tea: गुळाचा चहा पिताय, सावधान!

हाणामारी करताना जुबेर ऊर्फ शिंगाड्या यासीन खाटीक, ईब्बू यासीन खाटीक, शेख रईस शेख रशीद, अश्पाक शेख, रवींद्र राजू हटकर, राकेश ऊर्फ डॉलर धनराज हटकर, आतिष ऊर्फ वास्तव हटकर, तोब्या धनराज हटकर (सर्व रा. तांबापुरा) यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे. या हाणामारीत जुबेर खाटीक व रवींद्र राजू हटकर जखमी झाले असुन त्यांच्यावर जिल्‍हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Fight Between 2 Groups In Tambapura Jalgaon Latest Marathi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JalgaonCrime News