Latest Marathi News | पोलिस हेल्पलाईनवरील थट्टा पडली महागात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

112 police helpline

Jalgaon News : Police Helplineवरील थट्टा पडली महागात!

जळगाव : शहरातील आकाशवाणी चौकातून पोलिस हेल्पलाइन नंबर ११२ डायल करून पोलिसांना विनाकारण त्रास दिल्याप्रकरणी दोनवेळच्या प्रसादासह जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.(FIR filed against drunk person for fake calling police helpline number jalgaon latest news)

हेही वाचा: Jalgaon Cyber Crime : Instagramवरुन धार्मीक भावना दुखावल्या

राहुल अशोक जैन (वय ३३, रा. प्रभात कॉलनी) या तरुणाने आकाशवाणी चौकात उभे राहून दारूच्या नशेत रविवारी २ ऑक्टोबरला रात्री दीड ते दोनच्या सुमारास पोलिस हेल्पलाइन नंबर ११२ डायल करून मदत मागितली.

पोलिसांनीही तत्काळ मदतीसाठी धाव घेत घटनास्थळ गाठले; परंतु राहुल जैन याने दारूच्या नशेत नंबर डायल करून विनाकारण पोलिसांना त्रास दिल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिस नाईक संतोष सोनवणे यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात संशयित आरोपी राहुल जैन याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक तुषार जावरे तपास करीत आहेत.

हेही वाचा: Jalgaon Cyber Crime : Online Diwali Offersने काढले दिवाळं तरुणीला २९ हजारांना गंडविले

टॅग्स :JalgaonPolice Inquiry