Bharat Agency : जळगावातील भारत एजन्सीला आग; अग्निशमन दलाची तत्परता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fire at bharat Agency.

Bharat Agency : जळगावातील भारत एजन्सीला आग; अग्निशमन दलाची तत्परता

जळगाव : शहरातील मध्यवर्ती भागात महापालिका सतरा मजली इमारतीलगत असलेल्या ‘भारत एजन्सी’ या दुकानाला रात्री आठच्या सुमारास आग (Fire) लागली.

मात्र, अग्निशमन दलाने आग तातडीने आटोक्यात आणली. (fire broke out in Bharat agency store which is adjacent to 17 storey building of Municipal Corporation jalgaon news)

आगीत पंतजलीच्या औषधींचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की महात्मा गांधीजी मार्गावर महापालिकेच्या सतरा मजली इमारतीलगत असलेल्या ‘भारत एजन्सी’ या दुकानास आग लागल्याचा फोन आला.

त्यानुसार रात्री आठच्या सुमारास अग्निशमन दलाचे तीन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आग फार मोठी नसल्यामुळे ती कर्मचाऱ्यांनी तातडीने आटोक्यात आणली. यात पंतजली कंपनीची औषधी व सौंदर्यप्रसाधने यांचे दहा ते १५ टक्के नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

आगीचे कारण समजू शकले नाही. अग्निशमन दलचेा अधिकारी शशिकांत बारी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. गोलाणी स्टेशनमधील अग्निशमन दल वाहक सुनील मोरे, कर्मचारी देवीदास सुरवाडे, संतोष तायडे, भगवान पाटील, महाबळ फायर

स्टेशनवरील गाडीवरील संजय भोळे, जगदीश साळुंखे, शिवाजीनगर फायर स्टेशनचे भरत छाब्रिया, संजय भोईटे, राजेंद्र रानवडे या कर्मचाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणली.

टॅग्स :JalgaonFire Accident