Sakal Interview : बासरी भगवंताचं वाद्य... वादनाची चळवळ रुजवायचीयं! : पंडित विवेक सोनार

flute player Pandit Vivek Sonar while interacting at the 'Coffee with Sakal' event held on Monday at Sakal's Industrial Estate office.
flute player Pandit Vivek Sonar while interacting at the 'Coffee with Sakal' event held on Monday at Sakal's Industrial Estate office. esakal
Updated on

Sakal Interview : बासरी भगवंताचं वाद्य. वीणा, डमरुप्रमाणेच बासरीला आध्यात्मिक अधिष्ठान आहे, म्हणून बासरीच्या मधुर ध्वनीत केवळ मनुष्यच नव्हे, तर जनावरेही रममाण होतात. खानदेश सांस्कृतिकदृष्ट्या काहीसा मागास असला, तरी हे चित्र बदलायचेयं.

माझ्यासह शिष्यगण अगदी शाळा- महाविद्यालयांपर्यंत बासरी वादनाचे धडे देतांय. खानदेशातील घराघरांत बासरी वादक झाले पाहिजे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून, ही चळवळ रुजविण्यासाठी आमचा ‘रियाज’ सुरू असल्याची भूमिका जगविख्यात बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसियांचे शिष्य पंडित विवेक सोनार यांनी मांडली.

‘सकाळ’च्या औद्योगिक वसाहतीतील कार्यालयास श्री. सोनार यांनी भेट दिली. ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष उपक्रमात त्यांनी त्यांच्या कला-संगीत क्षेत्रातील प्रवासाबद्दल दिलखुलास चर्चा करत गुरुवर्य पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या तालिमीबद्दलचे अनुभवही शेअर केले. त्यांच्यासोबत त्यांचे शिष्य लक्ष्मण राजपूत, प्रसाद कासार आदी उपस्थित होते.

तत्पूर्वी मुख्य बातमीदार सचिन जोशी यांनी त्यांचे पुस्तक भेट देऊन स्वागत केले. (flute artist Pandit Vivek Sonar interview at sakal jalgaon news)

चौथीपासून बासरीशी मैत्री

पंडित विवेक सोनार मूळचे चाळीसगावचे. त्यामुळे बासरीतील प्रवासाबद्दल सांगताना ते चाळीसगाव ते नाशिक-मुंबई व पुढे देश-विदेशातील प्रवासावर मुक्तपणे बोलले. खरंतर दुसरीत असतानाच हाती खेळण्यातील बासरी होती. ती काही नीट वाजवता येत नव्हती. इयत्ता चौथीत असताना, अडगळीत सापडलेली स्टीलची बासरी कानसने घासून चकाचक केली.

ती वाजविण्याचा प्रयत्न केला, पण जमले नाही. चाळीसगावी तेव्हा घराजवळच एक बॅन्ड होता. त्यातील मुलगा श्‍यामने माझ्या बासरीवर ‘संजोग’मधील ‘यशोदा का नंदलाला’ हे गीत वाजवलं. नंतर मी प्रयत्न करूनही मला ते जमले नाही. सात-आठ दिवस प्रयत्न केल्यांनंतरही बासरी काही जमेना, पण प्रयत्न थांबवले नाहीत. शेवटी ‘देहाची तिजोरी’ या भक्तिगीतातून बासरीचा सूर सापडला. तेव्हापासून बासरीशी कायमची मैत्री झाली.

वारकरी कुटुंबाचा वारसा

आमच्या कुटुंबाला वारकरी परंपरा लाभलेली. आजोबा, वडील दोघेही वारकरी. रेल्वेत नोकरीस असलेले माझे वडील विश्‍वनाथ ऊर्फ रामचंद्र यांना गाण्याचीही आवड. भक्तिसंगीत ते गायचे. भाऊ घन:श्‍याम गुरव गल्लीतील मुलाकडे संगीत शिकायचा. मीही बासरी शिकण्याचा हट्ट धरला. तोवर विविध गाणी वाजवता येत होती. त्यावेळी वडिलांनी ३० रुपयांची बासरी विकत घेऊन दिली. तेव्हा ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

flute player Pandit Vivek Sonar while interacting at the 'Coffee with Sakal' event held on Monday at Sakal's Industrial Estate office.
Nashik Kala Katta | प्रतिभेतून प्रतिमा साकारणारे युवा शिल्पकार : श्रेयस गर्गे

पंडित अंतापूरकर पहिले गुरू

ती बासरी घेऊनच वडिलांनी पंडित पुरुषोत्तम अंतापूकरांकडे नेले. त्यांच्याकडे इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांनी बासरी शिकविण्यासाठी मला समर्पित शिष्य हवा, असे सांगितले. मी सहमती दर्शवली. रविवारवगळता दररोज क्लास होणार होता. सुरवातीचे सहा महिने त्यांनी मला बासरीला हातच लावू दिला नाही.

‘बासरी शिकायची तर कान तयार करावे लागतील. त्यामुळे आधी ऐक’, असे त्यांनी बजावले. दररोज त्यांच्या बासरीचा रियाज ऐकायचेच काम दीर्घकाळ केले. सहा महिन्यांनंतर त्यांनी हाती बासरी दिली. त्यानंतर मी मागे वळून पाहिले नाही.

त्यांच्याकडे सात वर्षे बासरीची साधना केली. नंतर अंतापूरकर गुरुजींनी ‘माझ्याकडचं शिकवणं संपलं. आता तू पंडित हरिजींकडे (हरिप्रसाद चौरसिया) जा’, असे सुचविले. तेव्हा नाशिकला बी.कॉम. करीत होतो. पुढे काय? हा प्रश्‍न होता. मात्र, बासरीत करिअर करायचे ठरवले. त्यासाठी भावासोबत एक व्यवसाय सुरू करण्याच्या ‘प्लॅन’ला नकार दिला.

साक्षात भगवंतच भेटले

बासरीतच करिअर करायचे, म्हणून पंडित हरिजींकडे शिकायचे ठरविले. दोन-तीनदा मुंबईला गेलो. भेट झाली नाही, अखेर चौथ्या प्रयत्नात पंडितजी भेटले. त्यांना पाहिल्यावर साक्षात भगवंतच भेटले, असे वाटले. त्यांच्या पायाशी थेट लोटांगणच घातलं.

flute player Pandit Vivek Sonar while interacting at the 'Coffee with Sakal' event held on Monday at Sakal's Industrial Estate office.
Nashik Kala katta : अष्टपैलू तबलावादक नितीन पवार

तेव्हा बासरीच्या दुर्दम्य इच्छेमुळे चाळीसगाव- मुंबई, असे एक दिवसाआड अप-डाऊन केले. बराच संघर्ष करावा लागला. मात्र, गुरुजींकडे शिकायला मिळतंय, म्हणून खूश होतो.

वृत्तपत्राची नोकरी केली

मुंबईत नोकरीस असलेले चाळीसगावातील कोमलसिंग पवार त्यादरम्यान भेटले. यांनी राहण्याची सोय केली. बऱ्याचदा खाण्याचीही व्यवस्था केली. बासरी शिकत असताना, आर्थिक अडचणी होत्या. त्यातून एका वृत्तपत्रात वितरण विभागात नोकरीही स्वीकारली. पुढे आणखी एका मोठ्या वृत्तपत्रासाठी मुलाखत दिली. मात्र, कोमलसिंग यांनी बासरीच तुझे करिअर असल्याचे सांगत नोकरी न करण्याचा सल्ला दिला. तो सल्लाच आयुष्य घडविण्याच्या कामी आला.

गुरुजींचे संकेत... शिस्त अन्‌ आनंद

एकीकडे गुरुजींकडे बासरीचे धडे घेत होतो. दुसरीकडे विद्यार्थ्यांसाठी बासरीची शिकवणी सुरू केली. कार्यक्रमही मिळत होते. मात्र, त्यातून मान मिळायचा, धन मिळत नव्हते. गुरुजींकडे अत्यंत शिस्तीत रियाज करावा लागे. ते भारतात असले, की रोज क्लास व्हायचा. काही चुकले, तर कटाक्ष टाकायचे.

काही आवडले तरी डोळ्यांनी कौतुक करायचे. त्यांच्या शिष्यांमध्ये मी सर्वांत लहान. एकदा त्यांनी एक कठीण स्वर वाजवले. इतरांनाही सांगितले. मात्र, कुणाला ते जमत नव्हते. माझा नंबर आला, तेव्हा गुरुजींनी अन्य शिष्यांना उद्देशून माझ्याकडे कटाक्ष टाकत ‘इसका सुनो’, असे म्हटले. तो प्रसंग माझ्या बासरी वादनाचे प्रमाणपत्र होता.

flute player Pandit Vivek Sonar while interacting at the 'Coffee with Sakal' event held on Monday at Sakal's Industrial Estate office.
Nashik kala katta : मनस्वी कलासाधक केशव कासार

रंगमंचावर झाले संस्कार

गुरुजींसोबत आतापर्यंत देश-विदेशांत जवळपास हजार कार्यक्रमांमध्ये मी साथसंगत केलीय. प्रत्येक कार्यक्रम वेगळा अनुभव. एकदा रियाज करताना द्रुपद जमत नव्हते. गुरुजींनी सांगूनही मला काही जमले नाही. नंतरच्या ७-८ कार्यक्रमांमध्ये गुरुजींनी द्रुपद वाजवले. त्यातून मी ते शिकलो. जळगावातही २००४ मध्ये त्यांना मी साथसंगत केली. त्यांनी अनेक संस्कार माझ्यावर रंगमंचावरच केले.

गुरुजींच्या बासरीचे ‘वर्तुळ’

पंडित हरीजींचे नाव जगभरात नंबर एकवर. त्यांनी स्वत:च्या स्वरावटीतून बासरीचे एक वर्तुळ तयार केलेय. जगभरातील वादक त्या वर्तुळाबाहेरचं काही वाजवूच शकत नाही. असे असूनही गुरुजी अत्यंत नम्रपणे ‘हे काहीच नाही, अजून एक वर्तुळ तयार करायचेय’, असे म्हणतात. तेव्हा आपल्याला तर अजून काहीच येत नाही, अशी जाणीव होते.

गुरुजींच्या नावाने पुरस्कार, शिष्यवृत्ती

बासरी वादनाची चळवळ रुजावी, म्हणून आमचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी गुरुजींच्या नावाने आम्ही लाखाचा पुरस्कार, शिष्यवृत्तीही सुरु केली आहे. खानदेशातील शिष्यांनी ती नेहमी मिळवावी, असा आमचा आग्रह असतो. आता अनेक शिष्य तयार होतांय. लक्ष्मण राजपूत, योगेश पाटील, मनोज गुरव, अशी नावांची मालिका. ते पुढचे शिष्य घडवतांय. ‘माय गुरुकुल’ नावाच्या ॲपमधून वादक तयार होतांय.

फ्ल्यूट सिंफनी’चे पायोनिअर

बासरी वादनात एका वेगळ्या प्रकारची धाटणी असलेला ‘सिंफनी’ हा प्रकार मी विकसित केला. यात एकाचवेळी शंभराहून अधिक वादक अनोख्या धूनद्वारे बासरी वादन करतात. २००७ ला ३५ वादकांसह नंतर ६५ व आता शंभर वादक आम्ही त्यात घेतो. एखादी धून आम्हाला नवीन वाटली आणि ती गुरुजींशी शेअर केली तर समजते, की त्यांनी ती धून २०-२५ वर्षांपूर्वीच वाजवलीय, असे पंडित विवेक नमूद करतात.

flute player Pandit Vivek Sonar while interacting at the 'Coffee with Sakal' event held on Monday at Sakal's Industrial Estate office.
Nashik Kala Katta: रंगभूमीवर जिवापाड प्रेम करणाऱ्या चतुरस्र अभिनेत्री : विद्या करंजीकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com