Jalgaon Fraud Crime : बहुराष्ट्रीय कंपनीच्या मालकाला साडेबासष्ट लाखांचा चुना

fraud
fraudesakal

Jalgaon News : शहरातील गोलाणी मार्केटमधील व्यापाऱ्याच्या कार्यालयात दोन जणांनी विश्वास संपादन करून बँकेकडून दोन डंपर खरेदी करण्याचे सांगून तब्बल ६२ लाख ६२ हजारांची फसवणूक केली. (Fraud of 62 lakhs to owner of multinational company jalgaon news)

शहरातील टेलिफोननगरातील रहिवासी राहुल जयप्रकाश बाविस्कर (वय ३१) याची मुंबईत जयको ग्लोबल प्रा. लि. नावाने कंपनी असून, जळगाव शहरातील गोलाणी मार्केटमध्ये त्याचे कार्यालय आहे.

रोहन विजय वैद्य आणि विजय वैद्य (दोन्ही रा. सेनापती बापट रोड, मुंबई) यांनी राहुलचा विश्वास संपादन करून बँकेकडून दोन डंपर खरेदी करण्यास सांगितले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

fraud
Fraud News : बनावट ठेव पावत्यांद्वारे २२ लाखांची फसवणूक ; वकिलासह तिघांविरोधात गुन्हा

डंपरचे मासिक हप्ते ६० हजार रुपये काररनामानुसार देण्याचे दोघांनी कबूल केले. त्यानुसार राहुलने बँकेतून कर्ज काढून २०१८ मध्ये डंपर खरेदी केले. मात्र, संशयितांनी मासिक हप्ते न भरता थकविले आणि राहुलकडून दहा लाख रुपये घेतले, असे एकूण ६२ लाख ६२ हजारांची फसवणूक केली.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर राहुल बाविस्कर याने मंगळवारी (ता. २) सायंकाळी सातला दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलिस ठाण्यात रोहन विजय वैद्य आणि विजय वैद्य यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

fraud
Jalgaon Fraud Crime : सायबर पोलिसांकडून बंगाली टोळी अटकेत; पर्यटन आवडणाऱ्यांना करायचे टार्गेट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com