Jalgaon News : चाळीसगावात कामगारांना मोफत भोजनाचा लाभ

Construction workers enjoying mid-day meal at Ahilya Devi Chowk on Patna Devi Road.
Construction workers enjoying mid-day meal at Ahilya Devi Chowk on Patna Devi Road. esakal

Jalgaon News : तालुक्यातील बांधकाम कामगारांसाठी ‘मोफत मध्यान्ह भोजन’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा शुभारंभ शहरातील पाटणादेवी रोडवरील अहिल्यादेवी चौकासह तालुक्यातील चैतन्य तांडा व ओझर येथे करण्यात आला. (Free mid day meal scheme has been launched for construction workers in chalisgaon jalgaon news)

या मध्यान्ह भोजनात भाजी, तीन पोळ्या, वरणभात, लोणचे आणि गोड पदार्थ दिला जातो. कामगारांना सकस व पौष्टिक आहार मिळावा हा या योजनेचा उद्देश आहे. चाळीसगाव तालुक्यात सुरुवातीला दोन हजार कामगारांना हे मध्यान्ह भोजन पुरविण्यात येणार आहे. जास्तीत जास्त बांधकाम कामगारांनी या मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार मंगेश चव्हाण यांच्या जनसेवा कार्यालयाने केले आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Construction workers enjoying mid-day meal at Ahilya Devi Chowk on Patna Devi Road.
Jalgaon News : लग्नात आहेर, सत्कार सोहळ्यांना फाटा; बैठकीत विविध ठराव एकमताने मंजूर

या योजनेच्या शुभारंभप्रसंगी भाजपच्या भटक्या विमुक्त आघाडीचे शहराध्यक्ष धर्मराज बच्छे, योगेश पाथरवट, उदेसिंग पवार, समाधान सोनवणे, दिनेश साबळे, राहुल आगोणे, भुरा आगोणे, पिंटू आगोणे, दीपक आगोणे उपस्थित होते. चैतन्य तांडा (ता. चाळीसगाव) येथे सोसायटीचे चेअरमन दिनकर राठोड, सरपंच अनिता राठोड, उपसरपंच आनंद राठोड, सेवानिवृत्त अधिकारी जुलाल राठोड, ग्रामपंचायत सदस्य भाऊराव चव्हाण, किसन चव्हाण, वसंत राठोड, मधुकर राठोड, उद्धव पवार आदी उपस्थित होते.

Construction workers enjoying mid-day meal at Ahilya Devi Chowk on Patna Devi Road.
Jalgaon News : सर्वाधिक उंचीच्या कुळकर्णी परिवाराची 'या' तारखेला मुलाखत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com