Jalgaon News : गटारी बांधण्याचे 10 कोटी महिन्यात संपले; मनपाची कार्यतत्परता

jalgaon municipal corporation news
jalgaon municipal corporation newsesakal

Jalgaon News : शहर महापालिका विकासकामे करीत नाही, अशी अनेकांची तक्रार असते. मात्र, २०२३-२४ मध्ये महापालिकेची अनोखी कार्यतत्परता दिसून आली.

गटारींसाठी असलेला दहा कोटींचा निधी संपला आहे, तर रस्त्यांच्या २८ पैकी २१ कोटींचा निधीही अर्थसंकल्प मंजुरीच्या महिनाभरात प्रस्तावित झाला आहे. (fund of 10 crores for sewers has been exhausted of municipal corporation jalgaon news)

जळगाव महापालिकेच्या दिरंगाईच्या कामांबाबत अनेकांची तक्रार आहे. अनेक वर्षांपासून रस्त्याची कामे रखडली आहेत, तर अनेक भागांत निधी नाहीत, म्हणून कामे थांबली होती. मात्र, महापालिकेने गेल्या मार्च महिन्यात २०२३-२४ आर्थिक वर्षाचे बजेट मंजूर केले.

अद्याप या बजेटच्या प्रतिछापखान्यातून अद्याप महापालिकेच्या लेखा विभागात पोचल्या आहेत. त्या नगरसेवकांच्या हातातही पडलेल्या नाहीत. मात्र, त्यापूर्वीच त्या बजेटमध्ये वर्षभरासाठी असलेला निधी अवघ्या महिनाभरात संपला आहे.

गटारींचा दहा कोटींचा निधी पूर्ण

महापालिकेच्या यंदाच्या अंदापत्रकात शहरात गटारी बांधण्यासाठी तीन कोटींचा निधी ठेवण्यात आला होता. मात्र, हा निधी अत्यंत कमी पडणार आहे. त्यामुळे तो दहा कोटी करावा, असा प्रस्ताव भाजप नगरसेवक विशाल त्रिपाठी यांनी दिला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

jalgaon municipal corporation news
Sakal Special News : सावली ऑक्सिजन देणाऱ्या वड कडुनिंब पिंपळाला जपा; आयुर्वेदचार्यांचा सल्ला

त्यानंतर सर्वानुमते त्याला मंजुरी देण्यात आली आणि अंदाजपत्रक मंजुरीच्या अवघ्या महिनाभरात तब्बल दहा कोटींच्या नवीन गटारी शहरातील विविध भागांत मंजूर करण्यात आल्या आहेत. वर्षभर वापरण्याचा हा निधी अवघ्या महिनाभरात संपला आहे.

रस्त्यांसाठी २८ कोटींची तरतूद

शहरातील रस्त्याच्या कामासाठी यंदाच्या आर्थिक वर्षात तब्बल २८ कोटींची तरतूद केली होती. महिनाभरात तब्बल २१ कोटी अंदाजपत्रकातील रकमेतून करण्यात आले. आता केवळ रस्त्यांसाठी सात कोटी शिल्लक आहेत.

कार्यतत्परता मनपाची

अंदाजपत्रकातील निधी वर्षभरसाठी असतो. ज्या भागात रस्त्यांची कामे निघतात, त्या भागात या निधीतून रक्कम खर्च केली जाते. मात्र, महापाकिलेच्या नगरसेवकांची मुदत ऑगस्ट २०२३ मध्ये पूर्ण होत आहे. त्यानंतर निवडणूका जाहीर होतील किंवा प्रशासक असेल.

jalgaon municipal corporation news
BJP Metting News : स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकींसाठी सज्ज राहा : डॉ. विजयकुमार गावित

त्यामुळे निवडणुकीअगोदर आपल्या वॉर्डातील कामे करून घेण्यासाठी नगरसेवकांची धावपळ सुरू आहे. त्याला अधिकारीही साथ देत आहेत. त्यामुळे या वर्षाच्या अंदाजपत्रकातील निधी अधिकाऱ्यांच्या ‘आयडिया’प्रमाणे नगरसेवकांनी आपल्या वाॅर्डातील रस्ते व गटारींच्या कामांसाठी काढून घेण्याची कार्यतत्परता दाखविली आहे.

महापालिकेची आज महासभा

महासभेनिमित्त शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांची सोमवारी (ता. २९) दुपारी चारला बैठक झाली. तीत सभेच्या अजेंड्यावर चर्चा करण्यात आली.

jalgaon municipal corporation news
Cotton Rate News : शेतकऱ्यांना मिळणार वाजवी दरात कापूस बीटी बियाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com