Jalgaon Crime: पोलिस वसाहतीत गर्दुल्ल्यांसह जुगाऱ्यांनी बनविले अड्डे! शाहूनगर पोलिस वसाहतीत भुरट्या चोरांचे पोलिसांनाच आव्हान

जिल्‍हा पोलिस दलाची मिळकत असलेल्या शाहुनगर पोलिस वसाहतीत जुगाऱ्यांचे अड्डे बनले आहे.
Gamblers made hideout with gangsters in police colony Shahunagar Police Colony rogue thieves challenge Jalgaon Crime
Gamblers made hideout with gangsters in police colony Shahunagar Police Colony rogue thieves challenge Jalgaon Crimeesakal
Updated on

जळगाव : जिल्‍हा पोलिस दलाची मिळकत असलेल्या शाहुनगर पोलिस वसाहतीत जुगाऱ्यांचे अड्डे बनले आहे.

सुरक्षीत ठिकाण म्हणून गर्दुल्ले, जुगारी आणि अमली पदार्थाच्या वितरणासाठी या खोल्यांचा वापर होत असल्याचा गंभीर समोर आला आहे.

पोलिसांच्या वसाहतीत राहून पोलिस यंत्रणेलाच आव्हान देण्याच्या या गैरप्रकारामुळे मात्र शाहुनगरातील नागरिकांना नको त्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. (Gamblers made hideout with gangsters in police colony Shahunagar Police Colony rogue thieves challenge Jalgaon Crime)

शाहुनगरात आजवर अवैध धंद्यात जुगारअड्डे, सट्टा-पत्ता चालवले जात होते. मात्र, काही दिवसांपासून रहिवासी परिसरातच पानटपऱ्यावर गुटख्याप्रमाणे अमलीपदार्थ सहज मिळू लागला आहे.

मोल मजुरी करणाऱ्याचा बहुतांश रहिवास असलेल्या या परिसरात अड्डा लॉटरी, दारू दुकाने, अमलीपदार्थांची खुलेआम विक्री होत आहे. नशेखोरीमुळे या परिसरात प्रचंड गुन्हेगारी वाढत असून जनसामान्यांची शांतता भंग झाली आहे.

अनेक दिवसांपासुनच्या तक्रारीवरून उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या पथकाने ३१ डिसेंबरच्या रात्री शाहुनगरातील छत्रपती शाहु महाराज कॉम्प्लेक्स परिसरातून एका ड्रग्ज विक्रेत्याला ताब्यात घेतले होते.

कायद्यात नमूद कॉन्टेटी या विक्रेत्यांकडे मिळत नसल्याने कारवाईची जोखीम पोलिस अधिकारी घेत नाही. परिणामी त्यांची सुटका होते.

Gamblers made hideout with gangsters in police colony Shahunagar Police Colony rogue thieves challenge Jalgaon Crime
Nashik Balaji investment Fraud Case: ‘बालाजी’ गुंतवणूक फसवणूक प्रकरणातील लतिकाचे हैदराबाद कनेक्शन!

पोलिस लाइन झाले अड्डे..

शाहुनगरातील ट्रॅफिक गार्डनची मोकळी जागा जिल्‍हा न्यायालयाला सुपूर्द केली आहे. या जागेवर एका बाजूने अंडापाव-चायनीज विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहे.

त्या समोरच वाईनशॉप असून वाइन शॉपवरुन दारू, अंडापाव गाडीवरून पार्सल घेवुन आजवर ट्रॅफिक गार्डनच्या मोकळ्या जागेत बसणाऱ्या दारुड्यांनी पोलिस लाइनच्या खोल्या उघडून तेथे बैठका मांडल्या आहेत.

दारुड्यांपाठोपाठ गर्दुल्ले, जुगारी, सट्टा-पत्ता खेळणाऱ्यांनी आता याच पोलिस खोल्यांमध्ये बस्तान बसविले आहेत.

दिवस-रात्र शाळा

शाहुनगर पोलिस लाईनच्या खोल्यांचा वापर गुन्हेगार करू लागल्याची इत्थंभूत माहिती जिल्‍हापेठ-शहर पोलिस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांना बऱ्यापैकी आहे.

ज्या प्रमाणे अमलीपदार्थ विकणाऱ्यांशी काही पेालिसांशी मैत्री आहे त्याच पद्धतीने या खोल्यांचा गैर वापर होत असल्याबाबतची माहिती असूनही याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

परिणामी दिवसा जुगार अड्डे आणि रात्री अवैध कृत्यासाठी या खोल्या वापरल्या जाऊ लागल्या आहेत.

Gamblers made hideout with gangsters in police colony Shahunagar Police Colony rogue thieves challenge Jalgaon Crime
Sudhakar Badgujar Fraud Case : बडगुजरांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश; अपहारप्रकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com