Crime News
Crime Newsesakal

Jalgaon Crime News : कुख्यात गुंड किरण खर्चेची मध्यवर्ती कारागृहात रवानगी

Jalgaon Crime News : एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतील कुविख्यात गुन्हेगार किरण शंकर खर्चे (वय ३०, रा. खुबचंद साहित्यानगर) याच्याविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायद्यांतर्गत (एमपीडीए) कारवाई करण्यात आली. (gangster Kiran kharche sent to Yerwada Jail jalgaon crime news)

जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर तत्काळ गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला मीरा भाईंदर येथून ताब्यात घेऊन येरवडा कारागृहात त्याची रवानगी केली. किरण खर्चेविरोधात खुनाचा प्रयत्न, जबरी लूट, हाणामाऱ्यांसह, हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन व इतर तब्बल १७ गंभीर गुन्हे, तर सहा अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत.

किरण खर्चे जामिनावर सुटताच पुन्हा गुन्हे करीत होता. वारंवार गुन्हे करण्याची सवय आणि दहशत माजवून जनसामान्यांच्या जगण्यास अपायकारक ठरल्याने पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या सुचनेनुसार एमआयडीसी पोलिसांनी किरणची संपूर्ण गुन्हे कुंडली तयार करून ती स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Crime News
Jalgaon Crime News : गर्दीचा फायदा घेऊन चक्क पोलिसाच्या पत्नीच्या पर्समधून दागिने लंपास

त्यावरून स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करण्यात आला. पोलिस अधीक्षकांनी अवलोकन केल्यावर हा प्रस्ताव जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याकडे सादर करण्यात आला. जिल्‍हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार किरण खर्चे याला एमआयडीसी पोलिस पथकाने मंगळवारी (ता. ६) मीरा भाईंदर येथून ताब्यात घेतले. तेथून जळगाव आणि नंतर येरवडा मध्यवर्ती कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली.

संशयिताच्या अटकेसह एमपीडीएच्या प्रक्रियेसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किशन नजन पाटील, निरीक्षक जयपाल हिरे, उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, अतुल वंजारी, युनूस शेख, सुनील दामोदरे, जयंत चौधरी, ईश्वर पाटील, सचिन पाटील, योगेश बारी, नाना तायडे, किरण पाटील यांनी परिश्रम घेतले.

Crime News
Jalgaon Crime News : मित्रांच्या वादातील हल्ल्यात तरुणाचा बळी; सकाळी मुक्ताईनगरात, तर रात्री जळगावात खून

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com