Jalgaon News : कापसा अभावी जिनिंग मिल्स बंद होण्याच्या मार्गावर

Cotton Crop News
Cotton Crop Newsesakal
Updated on

जळगाव : जिल्ह्यात कापूसटंचाई निर्माण झाल्याने जिल्ह्यातील दीडशेपैकी केवळ ७५ जिनिंग प्रेसिंग मिल्स सुरू होत्या. आता त्यातील ५० जिनिंग बंद झाल्या आहेत, तर २५ जिनिंग बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

यंदा कापसाचे उत्पादन जास्त असले, तरी ८५ टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. कापसाला दहा ते १३ हजारांचा दर मिळेल, तेव्हा कापूस विकू, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे.

कापसाला मागील वर्षी १३ ते १४ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. तो यंदाही मिळेल, या अपेक्षेने शेतकरी बाजारात कापूस आणत नसल्याचे चित्र आहे. सध्या साडेसात ते आठ हजारांचा दर कापसाला मिळत आहे. (Ginning mill on verge of closure due to lack of cotton Jalgaon News)

Cotton Crop News
Jalgaon News : कर्ज देण्याच्या आमिषाने तरुणाची तब्बल 7 लाख 60 हजारांत फसवणूक

यामुळे शेतकऱ्यांनी घरात कापूस साठवून ठेवला आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाच्या गाठींना हव्या त्या प्रमाणात मागणी नाही. सोबतच कापसाचे मोठे उत्पादन यंदा झाले आहे. व्यापारी कापसाचा दर्जा पाहून साडेसात ते आठ हजारांचा दर देत आहेत. कापसाअभावी जिनिंग मिल्स सुरू राहू शकत नाहीत.

सध्या एका पाळीत जिनिंग सुरू आहेत. एखाद्या जिनमध्ये चारशे गाठी तयार होत असतील, तर त्यांना केवळ दोनशे गाठींचाच कापूस उपलब्ध होत आहे. दोनशे गाठी असूनही तयार करता येत नाहीत, अशीच स्थिती सर्व जिनिंगची आहे.

कापसाच्या गाठींना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी नाही. त्यामुळे गाठी तयार करून कोणाला विकणार, असा प्रश्‍न जिनिंग चालकांना पडला आहे. एकंदरित बाजारपेठेत कापूस विक्रीसाठी येणे बंद झाल्याने कापसाअभावी जिनिंग व्यवसाय धोक्यात आला आहे.

मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

Cotton Crop News
Jalgaon News : भूषण शेवरेच्या खुनातील दोन संशयितांना अटक

चांगल्या दराची ही होती कारणे

कापसाला गेल्या वर्षी मार्च महिन्यात १३ हजारांचा दर मिळाला होता. मागील वर्षी कापसाचे उत्पादन चांगले होते. मात्र, अतिवृष्टीने कापसाचे नुकसान अधिक झाले. बाजारपेठेत कापूसच नव्हता. आंतरराष्ट्रीय स्तरावर कापसाला अधिक मागणी होती. यामुळे व्यापाऱ्यांनी कापसाला वरील दर दिला.

सध्या आंतरराष्ट्रीयस्तरावर कापसाला मागणी कमी झाली आहे. यामुळे व्यापारी जादा भाव सध्या देऊ शकत नसल्याचे चित्र आहे. मार्च महिन्यात आंतराष्ट्रीय स्तरावर कापसाची मागणी वाढेल, खंडीचे दर वाढतील, पर्यायी व्यापाऱ्यांना कापसाला चांगला दर द्यावा लागेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. दर दहा हजारांपुढे गेल्यानंतर कापूस विकू, अशा मनस्थितीत शेतकरी आहेत.

"कापूस घरात आहे. मात्र, दर नाही. उत्पादन खर्च तर निघाला पाहिजे. मार्च महिन्यात दर वाढतील, अशी आशा आहे. तेव्हा कापूस विकून खरिपाची तयारी सुरू करू."

-विजय पवार, शेतकरी

Cotton Crop News
Nashik News : विनयनगरच्या वादग्रस्त भूखंडावरील अतिक्रमण हटविणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com