Jalgaon News : भूषण शेवरेच्या खुनातील दोन संशयितांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arrested News

Jalgaon News : भूषण शेवरेच्या खुनातील दोन संशयितांना अटक

जळगाव : पाचोरा शहरातील २३ वर्षीय तरुणाचा वाहनाचा कट मारल्यावरून चाकू भोसकून खून केल्याची घटना जानेवारी २०२२ मध्ये घडली होती.

या गुन्ह्यात यापूर्वीच पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली असून, वर्षभरापासून फरार असलेल्या आणखी तीन संशयितांना गुन्हे शाखेने शनिवारी (ता. २१) वावडदा (ता. जळगाव) येथून अटक केली आहे.

३० जानेवारी २०२२ ला सायंकाळी साडेसहा ते साडेसातला पाचोरा- पुनगाव रोडवरील बुऱ्हानी इंग्लिश मीडियम स्कूलच्या आवारात तरुणांच्या झालेल्या भांडणात भूषण नाना शेवरे (वय २३, रा. दुर्गानगर, पाचोरा) याचा तीक्ष्ण हत्याराने भोसकून खून करण्यात आला होता. (Two suspects in Bhushan Shevare murder arrested number of murder suspects in custody from vavhadga has reached five Jalgaon News)

हेही वाचा: Nashik News : विनयनगरच्या वादग्रस्त भूखंडावरील अतिक्रमण हटविणार

याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली होती. ३१ जानेवारीला उर्वरित तिघांना अटक करण्यात आली होती.

या गुन्ह्यात लोकेश ऊर्फ विकी श्‍यामराव शिंदे, मयूर दिलीप पाटील, राकेश ऊर्फ सचिन राजेंद्र चौधरी, सागर प्रकाश पाटील, अविनाश ऊर्फ भद्रा सुरेश पाटील, राहुल ऊर्फ मॉडी पाटील, चेतन ऊर्फ स्टायलेश पाटील आणि पवन (पूर्ण नाव मा‍हीत नाही) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दोनच दिवसांत आठ संशयितांना अटक केली होती. मात्र, संशयितांचे साथीदार वर्षभरापासून फरारी झाले होते.

मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

हेही वाचा: Nashik News : नाशिक रोडला 2 गटातील वादातून रेल्वे आरक्षण केंद्रावर दगडफेक

पाचेारा खुनातील दोन संशयित वावडदा येथे दडून बसल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशन नजन पाटील यांना मिळाली. त्यांच्या पथकातील उपनिरीक्षक गणेश चोभे, विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, महेश महाजन, पोलिस नाईक विजय पाटील, प्रीतम पाटील, सचिन महाजन यांनी रोशन ओंकार साळुंके (रा. शाहू कॉलनी, पाचोरा) आणि तेजस प्रदीप पाटील (जयराम कॉलनी, पाचोरा) यांना अटक केली व पाचोरा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

हेही वाचा: Nashik News : दिवसा पुन्हा जवानाचे घर फोडले; सिन्नरमध्ये दोन दिवसांतील दुसरी घटना