Jalgaon Fraud Crime: बनावट दस्तावेजाद्वारे मिळविले ‘नॉन क्रिमीलेअर’; भुसावळच्या सेतू केंद्रचालकाविरुद्ध गुन्हा

fake document
fake document esakal

Jalgaon Crime News : येथील सेतू सुविधा केंद्रचालकाने एका तरुणीला बनावट दस्तावेज तयार करून ‘नॉन क्रिमीलेअर’चा बनावट दाखला दिल्याचा खळबळजनक प्रकार शहरात उघड झाला आहे.

यात शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शहरातील धम्मनगर भागातील ‘इंटरनेट ऑनलाइन सर्व्हिस’ महा ई-सेवा केंद्र (सेतू सुविधा केंद्र)चालक संशयित उत्तम काशीनाथ इंगळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वेल्हाळे (ता. भुसावळ) येथील पूजा संजय कोळी (वय २७) यांनी नॉन क्रिमीलेअर दाखला मिळण्यासाठी सेतू केंद्रात ऑनलाइन अर्ज केला होता. (girl was given fake certificate of non creamy layer by creating fake documents jalgaon fraud crime news)

त्यानंतर या प्रकरणात १९ नोव्हेंबर २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२१ दरम्यान ‘इंटरनेट ऑनलाइन सर्व्हिस’ या नावाने महा-ई सेवा केंद्र (सेतू सुविधा केंद्र) मधून कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली होती.

त्यावरून सदर सेतूचालकाने ३० नोव्हेंबर २०२१ ला पूजा कोळी यांना नॉन क्रिमीलेअर दाखला दिला आहे. त्यानंतर कोळी यांची मुंबई पोलिस दलात निवड झाल्याने त्यांचे सदर नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र पडताळणीकामी तहसीलदार भुसावळ यांच्याकडे प्राप्त झाले होते.

या नॉन क्रिमीलेअरवर १२८६२१११२५१००३०२३५५१५ असा २१ अंकी नंबर असल्याने व त्यावरील बारकोड हे ऑनलाइन डेटा बेसवर तसेच महाआयटी सेल, मुंबई येथे मॅच होत नसून, हे नॉन क्रिमीलेअर संशयित उत्तम इंगळे याने बनावट तयार करून ते पूजा कोळी यांना दिल्याचे दिसून येत आहे. तसेच, संशयित इंगळे याने कोळी यांना कागदपत्रे नॉन क्रिमीलेअर दाखल्याच्या पडताळणीसाठी तहसीलदार यांनी मागविलेले आहेत, असे सांगून त्यांच्याकडून कागदपत्रे प्राप्त करून घेतली.

fake document
Jalgaon Crime News : संगणकीय चक्री जुगारावर छापा; सिंधी कॉलनीत पोलिसांची कारवाई

२० सप्टेंबर २०२३ ला कोळी यांची संमती न घेता किंवा त्यांना काही एक माहिती न देता त्यांच्या नावे नॉन क्रिमीलेअर मिळण्यासाठी बनावट अर्ज सादर करून हा अर्ज प्रकरणांमध्ये तलाठी वेल्हाळे- जाडगाव- मन्यारखेडे यांचा १२ सप्टेंबर २०२३ चा संजय पुंडलिक कोळी (पूजा संजय कोळी यांचे वडील) यांच्या नावाचा बनावट उत्पन्नाचा दाखला तयार करून तो प्रकरणाबरोबर जोडून सादर केलेला असल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्यामुळे संशयित उत्तम इंगळे (रा. म्युन्सिपल पार्कनगर, भुसावळ) या सेतू सुविधा केंद्रचालक बनावट नॉन क्रिमीलेअर तसेच तलाठी वेल्हाळे- जाडगाव- मन्यारखेडे यांचा बनावट उत्पन्नाचा दाखला तयार करून शासनाची तसेच पूजा कोळी यांची फसवणूक केली आहे. म्हणून उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे नियुक्त असलेल्या नायब तहसीलदार प्रीती लुटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

"भुसावळ तालुक्यातील सर्व सेतू सुविधा केंद्रांची तपासणी केली जाईल, तसेच आतापर्यंत असे किती बनावट दाखले देण्यात आले आहेत, यांची सखोल चौकशी करण्यात येईल व बनावट दाखले निष्पन्न झाल्यास त्याचे सेतू सुविधा केंद्र रद्द करून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील." - जितेंद्र पाटील, उपविभागीय अधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी

fake document
Crime News: धक्कादायक! घरातील गुप्तधन शोधण्यासाठी १२ वर्षांच्या मुलाचा नरबळी देण्याचा प्रयत्न

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com