Gold Silver Rate: लग्नसराईमुळे सोने, चांदीला झळाळी! चांदी पोचली किलोला 77 हजारांवर अन सोने....

Gold Silver
Gold Silversakal media

Gold Silver Rate : दिवाळीनंतर आता लग्नसराईमुळे सोने, चांदीला मागणी वाढली आहे. दिवाळीच्या पर्वात सोने तेजीत होते. आता लग्नसराईत सोने तेजीत आहेच, सोबत चांदीही बुधवारी (ता. २९) किलोला ७७ हजार रुपयांपर्यंत पोचली.

सोन्याचा भाव ६१ हजार ते ६१ हजार ३०० रुपये प्रती तोळा आणि चांदीचा भाव किलोला ७२ ते ७३ हजार रुपये दिवाळीच्या पर्वात १० ते १६ नोव्हेंबरला दरम्यान, होता. दिवाळीनंतर सोने, चांदीच्या दरात उसळी सुरू आहे. (gold silver rate increase jalgaon news)

दिवाळीचे पर्वा संपल्यानंतर तुलसी विवाहानंतर लग्नाचा धडाका सुरू झाला आहे. त्यामुळे सोन्याला अधिक मागणी वाढली आहे. लग्नासाठी मणी मंगळसूत्र, बांगड्या, कानातील डूल, गळ्यातील चंद्रहार, नाकातील नथ, चांदीचे पैंजण, जोडवे यांना विशेष मागणी आहे.

चांदीत सहा हजारांची ’उसळी’

चांदी १२ ऑक्टोबरला ७१ हजार प्रती किलो होती. ३१ ऑक्टोबरला ती ७४ हजारांवर गेली. १४ नोव्हेंबरला चांदीचा भाव ७१ हजारांपर्यंत खाली आला. सोमवारी (ता. २७ ) हाच भाव ७६ हजारांवर गेला. दीड महिन्यात चांदीत सहा हजार रुपयांची उसळी झाली. सोन्याच्या भावात ३ हजार ८०० रुपयांनी वाढ झाली आहे.

सोने-चांदीचा भाव

(सोन्याचा तोळ्याला आणि चांदीचा किलोचा)

(जीएसटी विना)

तारीख सोने चांदी

Gold Silver
Sovereign Gold Bond: 'या' सरकारी योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट, तुम्ही गुंतवणूक केली आहे का?

१२ ऑक्टोबर ५८ हजार ७०० ७१ हजार

३१ ऑक्टोबर ६१ हजार ३०० ७४ हजार

१० नोव्हेंबर ६१ हजार ७२ हजार

१४ नोव्हेंबर ६० हजार ३०० ७१ हजार

१७ नोव्हेंबर ६१ हजार ३०० ७५ हजार

२७ नोव्हेंबर ६२ हजार ७६ हजार

२९ नोव्हेंबर ६२ हजार ८०० ७७ हजार

Gold Silver
Gold At Record High: सोन्याच्या भावाने मोडले सर्व रेकॉर्ड, सोने सर्वकालीन उच्चांकावर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com